भारतामध्ये २ महाकाव्य लिहिली गेली ती म्हणजे रामायण व महाभारत होय. ही साहित्यिकृती पद्य रूपामध्ये लिहिली गेली. या काव्याचे कथानक पद्य रूपामध्ये आढळते. साहित्याची अनमोल कृती म्हणून हे काव्य मानली जातात.होमर नावाच्या कवीने ही महाकाव्य लिहिण्याची नोंद आहे. अश्वघोष या विचारवंतानेही बुद्धांच्या जीवनावर पद्य स्वरूपात काव्य लिहिलेले आहे. महाभारत काव्यातील महानायक म्हणून श्रीकृष्णाचे चरित्र मांडण्यात आलेले आहे. श्रीकृष्णाने आपले जीवन संघर्षातून उभे केलेले दिसून येते. श्रीकृष्णाचा जन्म वंद्य अष्टमीला झालेला आहे असं मानण्यात येते. पुरातत्व विभाग श्रीकृष्णाच्या जन्माला दुजोरा देत नसले तरी असा महानायक बहुजनांना एकत्रित करून सांघिक शक्तीतून अनेक कृती यशस्वी करून दाखवतो. श्रीकृष्ण हा मथुरेचा राजा कंस याचा भाचा म्हणजे देवकीचा पुत्र म्हणून दाखवला आहे. श्रीकृष्णाच्या जन्मापासून संघर्ष सुरू होतो ते श्रीकृष्ण देहांत होईपर्यंत जीवन प्रवास काटेरी स्वरूपाचा आहे. अशा संघर्षात्मक जीवनातून यशस्वी प्रवास करणारा श्रीकृष्ण महानायक आहे. काही साहित्यिकांनी या महानायकांना चमत्काराच्या ओंजळीत टाकून त्या महापुरुषांच्या खऱ्या कार्याकडे पाठ फिरविली आहे. श्रीकृष्णाच्या जन्मदिवशी गोपाळकाला म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. श्रीकृष्णाने बालपणी अनेक सवंगडी जमा करून त्या सवंगड्यांना एकत्रित करून काला केल्याचे उदाहरण दिलेले आहे. श्रीकृष्णाचे सवंगडी सर्व समाजातील मुले होती. त्यामध्ये त्या काळात गोकुळात पशुसंवर्धन लागणारी मंडळी जास्त प्रमाणात होती. शेती व पर्यायी पशुपालन हा त्यांचा व्यवसाय होता. अशा काळात मथुरेच्या राजाकडे गोकुळातून दूध, दही, ताक लोणी यासारखे पदार्थ राजाच्या दरबारी घेऊन जावे लागे. पर्यायाने गवळ्यांची व बहुजनांची मुले दूध ,दही ,ताक, लोणी यापासून वंचित राहत असत. मेहनत करणारे गवळी हे दुधासाठी कष्ट घेत असत मात्र त्यांच्या मुलांना या पदार्थांपैकी कोणतेही पदार्थ मिळत नसत. अशावेळी श्रीकृष्णाने मुलांना एकत्रित करून स्वतःच्या घरापासून ते गवळणींच्या घरापर्यंत दूध, दही, ताक, लोणी याची चोरी केली. सर्व सवंगड्यांना दुधासह सर्व पदार्थांचा आस्वाद घेता आला. अशा पदार्थात पोहे लाह्या खडीसाखर टाकून केला जात असे. या काल्याचा आस्वाद सर्व सवंगडी घेत असत. या काळात श्रीकृष्ण सह सर्व सवंगडी जंगलात गुरे राखीत. निसर्गातील सर्व फळांचा आनंद घेत असत. प्रत्येकाच्या घरातून आणलेले चटणी भाकर खात असत. त्यात त्यांची एकीची भावना दिसून येत होती. श्रीकृष्णाने केवळ खाण्याच्या पदार्थाचा काला केला नाही तर मित्रांमध्ये वैचारिक मंथन सुद्धा केले. अशा सवंगड्यातून सुदामासारखा निस्वार्थ विचाराचा मित्र त्याला मिळाला. महिला संघटन करण्यामध्ये ही श्रीकृष्णाची भूमिका चांगली होती. साहित्यिकांनी त्याच्या कृतीला शृंगारिक प्रदान करून प्रतिमा डागाळली. श्रीकृष्णाला सोळा हजार शंभर बायका असल्याचे लिहून ठेवलेले आहे.हे जरा अतिशयोक्ती लिखाण केलेले आहे. नरकासुराच्या ताब्यातून सुटका केलेल्या काही स्त्रियांचे लिखाणात नमूद केलेले आहे. काल्पनिक लिखाणामुळे श्रीकृष्णाचे चरित्र केलेले आहे. गावातील लोक, महिला,बालके मनोरंजनासाठी काही गीतांचा, संगीताचा आस्वाद घेत असत. श्रीकृष्णाने सर्व ग्रामस्थांना एकत्रित करून त्यांच्यात नाद माधुर्य निर्माण केले. ग्रामस्थांच्या सहकार्याने अनेक चांगल्या कृती केल्या. इंद्राच्या नावाने लोकांमध्ये दबदबा होता. पाऊस पाडणारा इंद्रदेव म्हणून मानले जात होते. परंतु श्रीकृष्णाने लोकांना एकत्रित करून इंद्राचे गर्वहरण केले. सामूहिक शक्तीतून अनेक चांगल्या गोष्टी घडतात हा आदर्श श्रीकृष्णाला जगाला दिला. श्रीकृष्णाचे चरित्र बहुआयामी होते. प्रत्येक नात्याला श्रीकृष्णाने महत्व दिलेले आहे. पांडवांची कुंती ही श्रीकृष्णाची आत्या होती. आपल्या आत्यासाठी व आतेभावांसाठी श्रीकृष्ण केले. द्रौपदीला बहीण म्हणून तिचे संरक्षण केले. कुणाकडून कसे मिळाले प्राप्त करून घ्यायचे याची कला श्रीकृष्णाकडे होती. आपल्या गुरु कडून म्हणजेच सांदीपनी ऋषी कडून ज्ञान मिळवून त्याचा वापर आपल्या जीवनात दिलेला आहे. भीष्मपितामह सारख्या ज्ञानी माणसाकडून आपल्या आप्तेष्टांसाठी मदत मिळवून घेण्यामध्ये श्रीकृष्णाचे कसब दिसून येते. युद्धाच्या अगोदर सामर्थ्याने युद्ध होऊन देणे या विचाराच्या श्रीकृष्ण दिसून येतो. वेळप्रसंगी युध्दातून पलायन ही करतो. म्हणजेच श्रीकृष्णाचे जीवन लवचिक असल्याचे सिद्ध होते. अर्जुनाला युद्धासाठी तयार करणारा श्रीकृष्ण हा खरा सारथी ठेवला. तरुणांमध्ये तेजस्विता, तपस्वीता, तत्परता निर्माण करण्याचे काम श्रीकृष्णाने केलेले आहे. सर्व बाबतीचे चौफेर ज्ञान असलेला श्रीकृष्ण याला जगतगुरु म्हटले गेले. कीर्तनकार , प्रवचनकार श्रीकृष्णाच्या चांगल्या कृतींचे वर्णन न करता काल्पनिक गोष्टी सांगून मनोरंजन करीत असतात. दहीहंडी फोडणे एवढेच श्रीकृष्णाचे कर्तुत्व नाही. दहया सारखे स्वच्छ पवित्र विचार ठेवून सर्वांनी एकत्र आले पाहिजे. सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन दही, लाह्या, खडीसाखर एकत्रित करून सर्वांना आनंदाने वाटप करणे हा काला होय. सर्व जाती धर्माचा लोकांनी एकत्र येऊन देशाच्या हिताची कृती करणे खऱ्या अर्थाने श्रीकृष्णाच्या कृतीला स्मरण करण्यासारखे आहे. श्रीकृष्ण बहुजनांचा नायक दाखविला आहे. श्रीकृष्ण वासुदेवाचा पुत्र दाखविला आहे. श्रीकृष्णाचे मावशी यशोदा ही नंदाची पत्नी होती.ते पशुपालन व शेती करीत असत. सामान्य गवळी समाजाचे नेतृत्व करीत होते. त्या काळात जातीआधारीत कामे नव्हती. श्रीकृष्ण यादव कुळातील होता. यादव कुळ बहुजनातील कुळ आहे. सामान्य समाजाचा नेता म्हणून श्रीकृष्णाकडे पाहिले जाते. श्रीकृष्णाने गीता वर्णन आहे. अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नांना दिलेले उत्तर आहे. त्यामध्ये कर्म वादावर विचार आहे. अध्यात्मिक विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. भक्ती योगा पेक्षा ज्ञानयोग याला महत्व दिलेले आहे. माणसाने केवळ भक्तीवर विसंबून न राहता तर्काचा विचार केला पाहिजे हे त्या गोष्टीवरुन दिसून येते. श्रीकृष्णाकडे उत्तम संघटन कौशल्य असल्याचे दिसून येते. सर्व समाजातील लोकांना आपलेसे करण्याची उत्तम कला श्रीकृष्णाकडे होती. कथा वाचकांनी श्रीकृष्णाच्या इतर पैलूंकडे लक्ष दिले नाही त्यामुळे श्रीकृष्ण यांचे चमत्कार सांगण्यात ते पटाईत झाले. आजच्या युगातील विद्यार्थ्याला श्रीकृष्णाचे काल्पनिक वर्णन आवडणार नाही. त्यामुळे कथा वाचकांच्या प्रवचनाला अभ्यासू तरुण वर्ग दिसत नाही. वारकरी संप्रदायाने श्रीकृष्णाचा प्रबोधनाचा विचार घेतला होता. आजच्या अध्यात्मातील व्यापारीकरणामुळे श्रीकृष्णाचे खरे विचार लोकांपर्यंत पोहोचविले जात नाही. श्रीकृष्णाला धर्मांध अनुयायांनी अवतारात गुरफटून ठेवले.एक सामंजस्य असलेला महानायक म्हणून प्रतिमा त्यांनी निर्माण केली नाही. आजचा तरुण श्रीकृष्णाच्या जयंतीनिमित्त मोठमोठ्या दहीहंडीसाठी स्तर लावून जयंती साजरी करतो. राजकारणी, समाजकंटक तरुण वर्गाला आकर्षित करून दहीहंडीचे सात, नऊ, अकरा, पंधरा स्तर लावून त्यांच्या जीवनाशी खेळतात. तरुण मुलांचे हातपाय मोडले गेले तरी राजकारण्यांना काही सोयरे सुतक नाही. आपला राजकारणाचा हेतू साध्य करण्यासाठी ते दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी पैसे मोजत असतात. अनेक मुलांचे आयुष्य उंचावरून खाली पडल्याने बरबाद झालेले झालेले आहे.कमी उंचीच्या दहीहंड्या फोडून हा उत्सव आनंदासाठी साजरा करायला काही हरकत नाही. परंतु जीवाचे हाल करून दहीहंडी साजरी करणे धोक्याचे आहे. शासनाने अतिउंचावर असलेल्या दहीहंड्यांना परवानगी द्यायला नको. श्रीकृष्णाने सामाजिक एकता निर्माण करून विधायक कामे केली. त्यासारखे सामाजिक कामे, वैचारिक कामे दहीहंडीच्या निमित्ताने पार पाडली गेली पाहिजे. श्रीकृष्णाला चमत्काराच्या नजरेतून न पाहता. श्रीकृष्णाने केलेल्या चांगल्या कृतींकडे लक्ष दिले गेले पाहिजे. गीतेमध्ये अभ्यासाशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले आहे. केवळ देवळात भक्ती करून उपयोग नाही तर ज्ञान मार्गाने, विवेकाने, तर्काने विचार करण्याची गरज आहे. युवकांमधून श्रीकृष्ण सारखा दमदार विचाराचा नेता निर्माण करण्याची गरज आहे. श्रीकृष्ण सारखा सखा प्रत्येकाने मिळविला पाहिजे. श्रीकृष्णाने गरीब व श्रीमंत असा भेद आपल्या मित्रांमध्ये कधीही केला नाही.आपलया मित्रांना भावाप्रमाणे दर्जा श्रीकृष्णाने दिला. आपल्या मित्रांमध्ये वैचारिक देवाणघेवाण करणे हाच खऱ्या अर्थाने काला आहे. सर्व समाजातील लोक एकत्र येणे ही काल्याची सुरुवात आहे. पंढरपुरात संत नामदेवांनी विविध जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये वैचारिक देवाण घेवाण केली त्याला खऱ्या अर्थाने काला म्हणतात








