सामाजिक कार्यकर्ता
शैक्षणिक वर्ष २०२५- २६ करीता वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्यांची यादी जाहीर झालेली आहे. या प्रवेश प्रक्रियेमध्ये विमुक्त जाती प्रवर्गात बोगस राजपूत भामटा आणि बोगस छप्परबंद यांनी मोठ्या प्रमाणावर घुसखोरी केल्याची बाब निदर्शनास आलेली आहे. जी की अत्यंत गंभीर आणि विमुक्त प्रवर्गात असलेल्या मुलांमुलींना वैद्यकीय शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार आहे. ही घुसखोरी केवळ वैद्यकीय अभ्यासक्रमापुरती मर्यादित राहिलेली नसून अभियांत्रिकी शिक्षण व इतर सर्वच अभ्याक्रमाबरोबरच नोकरीलासुद्धा मारक ठरत आहे. तरीही आमचे मंत्री, आमदार समाजाशी आमचे कांहीही देणेघेणे नाही अशी भूमिका घेऊन गाढ झोपलेले आहेत. *यावर्षी एमबीबीएस/बिडीएस/बीएएमएस/बीयुएमएस/बी पी टी/या वैद्यकीय प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची जी यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्या यादीचे अवलोकन केले असता एकूण २६१ बोगस राजपूत भामटा आणि ६५ बोगस छप्पर बंद विद्यार्थ्यांनी घुसखोरी केल्याचे निदर्शनास आले आहे. सत्तेत समाजाचे दोन मंत्री आणि सत्ता पक्षाचे दोन आमदार असूनही एवढ्या मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होत असेल आणि आमचे मंत्री, आमदार तोंडाला चिकटपट्टी लावून चिडीचुप बसत असतील तर यांना आता डोक्यावरुन खाली उतरवून त्यांची जागा दाखवण्याची गरज आहे.* या घुसखोरी विरोधात डॉ अनिल साळुंके (राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय राजपूत भामटा युवक आघाडी) आणि विविध सामाजिक संघटनांनी दि.२०/८/२०२५ रोजी राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार, मा.आयुक्त राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष सी. ई. टी.सेल,महाराष्ट्र., मा. महासंचालक,बार्टी पुणे,
डायरेक्टर मेडीकल एज्युकेशन अँड रिसर्च (DMER), महाराष्ट्र. आदिंकडे रितसर तक्रार दाखल केलेली आहे.
सर्वसामान्य कार्यकर्त्यांनीच दिवसेंदिवस अत्यंत गंभीर होत चाललेल्या बोगस घुसखोरीविरुद्ध आवाज उठवायचा का ? समाजाचे सत्तेत बसलेले मंत्री, आमदारांची कांहीच जबाबदारी नाही का ? अरे मुर्दाडांनो थोडी लाज शरम बाळगारे !
बांधवानो ! समाजाचे झुल पांघरुन सत्तेत बसून आपली तिजोरी भरणाऱ्या मंत्री आणि सत्ता पक्षात असलेल्या आमदारांनी तात्काळ सरकारकडे या बोगस घुसखोरीची चौकशी करायला लावून खऱ्या विमुक्त प्रवर्गातील मुलांमुलींना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली नाही तर हे जेथे सापडतील तेथे त्यांचे तोंड काळे करुन त्यांचा राजीनामा मागा. खरे तर यांनी मनावर घेतले तर या बोगस घुसखोरीला कायमचा आळा बसू शकतो, पण समाजाचे रक्त शोषुन सत्ता भोगणाऱ्यांना समाजाच्या समस्याच सोडवायच्या नाहीत हे त्यांच्या मौनी भूमीकेतून स्पष्ट दिसते आहे. जर मंत्री संजय राठोड, मंत्री इंद्रानील राठोड, आ.डॉ. तुषार राठोड, आ.बाबुसिंग महाराज या सर्वांनी बोगस घुसखोरीचे प्रकरण गांभीर्याने घेऊन त्यावर योग्य उपाययोजना करण्यासाठी सरकारकडे आग्रह धरला नाही तर त्यांनी समाजाच्या रोषाला बळी पडण्यापूर्वी तात्काळ राजीनामा देऊन आपले तोंड काळे करावे.
समाजाचे खरे मारेकरी आणि शत्रु समाजाच्या नावाने सत्तेचा मलिदा खाणारे ही गिधाडंच आहेत. आजवर यांचे केले तेवढे लाड खुप झाले. बांधवानो, आता तरी जागे व्हा ! सामाजिक संकटाचे गांभीर्य लक्षात घ्या. कुठे तरी तुमचे रक्त सळसळू द्या. या सत्ताभोगी विरुद्ध तीव्र आक्रोश प्रगट करा. आणि झोपेचे सोंग घेतलेल्या या गिधाडांना जागे करुन त्यांना त्यांच्या सामाजिक कर्तव्याची जाणीव करुन द्या.
दिनांक : २१/८/२०२५
छत्रपती संभाजीनगर
फुलसिंग जाधव
सामाजिक कार्यकर्ता








