गोपवाडीचे तक्रारदार
पुसद :-तालुक्यातील गोपवाडी येथील संतोषी माता बचत गट यांच्याकडे स्वस्त धान्य दुकान अनेक वर्षापासून चालवण्यासाठी ग्रामस्थांनी दिली आहे. संतोषी माता बचत गटाचे अध्यक्षा सौ. नंदाबाई रंगराव मेटे आहेत. संतोषी माता बचत गटाचे अध्यक्षा कार्डधारकांचे थम आणि अंगठा घेऊन सुद्धा धान्य वाटप करत नाही अशी तक्रार कार्डधारकाने केली. थम घेतल्यानंतर मालाची पावती मागितल्यानंतर ही सुद्धा ग्राहकांना दिली जात नाही. कार्ड धारकाकडून नवीन कार्डासाठी १५०० रुपयाची मागणी संतोषी माता बचत गट अध्यक्षा सौ. नंदाबाई रंगराव मेटे यांची पती ग्राहकाकडे करतात असे कार्डधारकांनी सांगितले. कार्डधारकांना धमकी, शिवीगाळ, दमदाटी करतात असे ग्राहकाने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. गोपवाडी येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करा अशी मागणी कार्डधारकाने केली. संतोषी माता बचत गट अध्यक्षा सौ. नंदाबाई रंगराव मेटे तसेच त्यांचे पती त्यांची सखोल चौकशी करून दर महिन्याला येणाऱ्या मालाची चौकशी करून ग्राहकांनाचे विचार ऐकून योग्य ती कारवाई संतोषी माता बचत गट अध्यक्षा आणि त्यांचे पतीवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. तक्रारदार यमुनाबाई मेटे, शारदाबाई, अरुणाबाई इंगळे, राजू टाले, चरण भाऊ, सखाराम भाऊ, बळीराम ठाकरे, शारदा ठाकरे, असे तक्रारदाराचे नाव आहे. तक्रारदाराची एकच विनंती आहे, कार्डधारकांना लवकरात लवकर न्याय मिळावा अशी अपेक्षा उपविभागीय अधिकारी पुसद यांच्याकडे कार्ड धारकांनी केली आहे.








