पुसद :- तालुक्यातील राजना गावापासून ३ किलोमीटर अंतरावर असलेला गाव रुई (गोस्ता) येथील वाघामाय माता मंदिर हजारो वर्षापासून आहे. आजूबाजू परिसरातील गावातील भक्तगण ग्रामदैवत असलेल्याचे सांगतात. ग्रामदेव असलेल्या देवीच्या मंदिरामध्ये नवरात्रोत्सव मातेच्या भक्तीभावात साजरा होत असतो. या निमित्ताने ग्रामीण भाविकांमध्ये नवचैतन्य असते. मंदिरामध्ये सकाळी महाआरती साठी भाविक भक्त मोठ्या संख्येने गर्दी करतात. यात महिला सर्वाधिक असतात. पहाटे ४ वाजेपासून महिला व पुरुषांची रांग लागत असते. दिवसभर मंदिर हे दर्शनासाठी खुले असतात. या मंदिरामध्ये दिवसभरामध्ये हजारो भाविक शहर व ग्रामीण भागातून येऊन दर्शन घेत आपला नवस पूर्ण करतात. पहाटेपासून भाविकांची महाआरतीसाठी गर्दी दिसून येते. वाघा माय मंदिर हे पूर्ण दगडी आहे. मंदिराच्या बाहेर ३ भव्य दीपमाळा आहे. चैत्र नवरात्री, शारदीय नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवरात्रीत इथे मोठा भंडारा देखील आयोजित करण्यात येतो. नवसाला पावणारी देवी असल्यामुळे भाविकांची गर्दी खूप असते.








