पुसद :-तालुक्यातील अगदी दऱ्या खोऱ्यात वसलेला ब्राह्मणगाव दऱ्याखोऱ्यात वसल्यामुळे शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. ब्राह्मणगाव हे पुसद पासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. गावाच्या सुखदुःखात भेटीगाठी ला आमदार व अनेक नेते मंडळी प्रत्येक गावाला भेट देत असतात, परंतु त्या गावातील समस्या कडे त्यांचा दुर्लक्ष असल्याचा पाहायला मिळतो. पण दुःखाची बाब अशी आहे की ब्राह्मणगाव, पारवा, उडदी,लाखी या गावातील तसेच रस्त्यावरील मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. गेल्या दोन-तीन वर्षापासून प्रत्येक गावातील नागरिक आमदार साहेबांना अनेक वेळा निवेदन देऊन ही आमदार साहेब जांबबाजार सर्कल कडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. प्रत्येक गावामध्ये आमदार व नेते मंडळी यांच्यावर नाराजी व्यक्त करतांना दिसत आहे. येत्या निवडणुकीमध्ये आम्ही आमदार साहेबांना तसेच पदाधिकाऱ्यांना जाब विचारू असे ब्राह्मणगावातील नागरिकांनी आपले मत व्यक्त केले. २ वर्षापासून रस्त्याचे दुरुस्ती पण केली नाही. त्या रस्त्याने वाहनधारकांना खड्ड्यामुळे मोठी कसरत करावी लागते. शाळकरी मुलांची बस सुद्धा जात असते त्यांच्या जीवाला काही झालं तर त्याला कोण? जबाबदार राहणार असे पालक वर्ग मधून सांगण्यात येत आहे. आमदार साहेब तसेच मोहिनीताई अनेक वेळा या रस्त्याने ये -जा करत असतात. डोळे असून देखील आंधळे असल्यासारखे गावातील समस्या कडे दुर्लक्ष करत असतात. आम्हाला आमदार साहेबांनी लवकरात लवकर नवीन रस्ते तयार करून द्यावी अशी विनंती ब्राह्मणगावातील ग्रामस्थ व्यक्त करत आहे.








