पुसद (प्रतिनिधी)- नागरिकांसाठी सणासुदीचा काळ आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी, आपल्या गावी जाण्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो. परंतु नेमक्या याच कालावधीत खाजगी बसवाल्यांकडून तिकीट दरांमध्ये अनेक पटींनी वाढ केली जाते. यामुळे शिक्षणानिमित्त बाहेरगावी असणाऱ्या विद्यार्थ्यांची, नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होते. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्या तसेचं दिवाळीच्या निमित्ताने अन्नपदार्थांतील होणारी भेसळ रोखण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याची मागण्यांचे निवेदन दिनांक ९ आक्टोबर २०२५ ,या दिवशी सुराज्य अभियानच्या वतीने श्री.आशिष बिजवल,उपविभागीय अधिकारी, पुसद यांना देण्यात आले.
या निवेदनात सुराज्य अभियान च्या वतीने पुढीलप्रमाणे मागण्या व सूचना करण्यात आल्या –
१. सर्व मार्गांवरील ऑन लाईन व ऑफ लाईन बस तिकीट दरांचे निरीक्षण करण्यासाठी एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करावा.
- सर्व प्लॅटफॉर्म्स ( रेड बस, मेक माय ट्रिप इत्यादी) व ऑपरेटर्स नी शासनाने ठरविलेल्या १.५ पट दरमर्यादेचे पालन अनिवार्य करावे.
- तिकीट दरवाढीबाबत तसेच खाजगी बस ऑपरेटर आणि om लाईन तिकिट बुकिंग प्लॅटफॉर्म्स बाबत तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांना व्हॉट्सअँप हेल्प लाईन व ऑन लाईन तक्रार पोर्टल उपलब्ध करून द्यावे आणि त्यांची प्रसिद्धी करावी.
- नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑपरेटर्स, एजंट्स व प्लॅटफॉर्मसविरुद्ध तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
- जिल्हा परिवहन कार्यालयांकडून सणासुदीच्या काळातील दरवाढीचे दर प्रत्येक आठवड्यानंतर अहवाल स्वरूपात संकलित करावे.
- तसेचं बाजार पेठेत पेढे, बर्फी, कुंदा, गुलामजाम यांसारखे पदार्थ विक्री साठी ठेवले जातात. यामध्ये उपयोगात आणला जाणारा मुख्य कच्चा माल खवा असतो. वाढत्या मागणीची पुर्तता करण्यासाठी खव्यात मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. अन्न व औषध प्रशासन विभायाकडे मिठाई चे नमुने घेऊन त्याची पडताळणी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी.
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियान चे सर्वश्री विनायक चिरडे, दीपक चिरडे, दीपक राजुरवार, महेश काळे, प्रदीप अडसळ, आशिष बुरडे, प्रवीण ढोरे, मकरंद पारटकर उपस्थित होते.








