Home » जीवनशैली » सामाजिक » जि.प.उच्च प्राथमिक शाळा पार्डी येथे माजी विद्यार्थी सभा संपन्न

जि.प.उच्च प्राथमिक शाळा पार्डी येथे माजी विद्यार्थी सभा संपन्न

Share:


पार्ङी निंबी

पुसद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पार्ङी येथील जिल्हा परिषद शाळेत आज दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रविवार रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पार्डी येथे शाळेत आजपर्यंत शिक्षण घेतलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांची सभा आयोजित करण्यात आलेली होती.

सभेला अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागोराव चिरमाडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून समाधान केवटे ग्रामपंचायत सदस्य तसेच ज्येष्ठ सदस्य सुभाष केवटे व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री अरुण बरङे उपस्थित होते.
याप्रसंगी गावातील सर्व माजी विद्यार्थ्यांना सभेसाठी सूचना देऊन उपस्थित राहणेबाबत कळविल्यानुसार सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते याप्रसंगी मुख्याध्यापक संतोष पदमवार यांनी शासनाच्या दि.1 ऑक्टोबर 25 च्या शासन निर्णयानुसार सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबतचे निर्णयाचे विषयी सविस्तर माहिती दिली, माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शाळेच्या भौतिक व शैक्षणिक विकासात प्रयत्न करावे यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले सभेला उपस्थित माजी विद्यार्थी पैकी समितीमध्ये कार्य करण्यास इच्छुक असणाऱ्यांची नोंदणी करण्यात आली, याप्रसंगी अरुण बरङे व नरेंद्र ढोले,सुभाष केवटे यांनी आपले विचार व्यक्त केले.लहू देवकते यांनी आभार व्यक्त केले.
सभेला गावातील माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *