पुसद प्रतिनिधी
पुसद तालुक्यातील मांडवा येथे क्रांतिसुर्य , बिरसा मुंडा यांची १५०वी जयंती ग्रामपंचायत कार्यालय मांडवा येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती उत्सव समिती व ग्रामपंचायत कार्यालय मांडवा यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विजय राठोड उपसरपंच, तर प्रमुख पाहणे दत्तराव पुलाते पोलीस पाटील,वसंता आडे सोसायटी अध्यक्ष,रमेश ढोले, कैलास राठोड हे मान्यवर उपस्थित होते.
या उपस्थित मान्यवरांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिवीर बिरसा मुंडा या महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
यावेळी ग्रामविकास अधिकारी एस.टी. तडसे यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण घावस यांनी केले तर आभार कृष्णा साखरे यांनी मानले.
यावेळी पांडुरंग चिरमाडे, पांडुरंग साखरे, नारायण घावस, नामदेव साखरे, सतोष पठारे,मारोती फोफसे,सतिष चिरमाडे,सर्व ग्रा.पं. सदस्य ,ग्रा.पं .कर्मचारी प्रदुम्न आबाळे,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.








