मेन्यू

लोड हो रहा है...

वसंतराव नाईक विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न

वसंत ✒️धारा न्यूज नेटवर्क 

पुसद : युवक मंडळ, पुसद द्वारा संचालित वसंतराव नाईक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, पुसद येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न झाला.
महाविद्यालयाच्या प्राचार्या कु. वंदना पोले मॅडम यांनी नविन शिक्षकांना नेतृत्वाची संधी देण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्री. महेश चव्हाण सर यांना बहाल केले. सह-अध्यक्ष म्हणून श्री. इंगळे सर उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे ज्येष्ठ विज्ञान शिक्षक श्री. अभिजीत राठोड सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविक इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीने केले.
विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने भाषणे दिली.
सह-अध्यक्ष श्री. इंगळे सर यांनी आपल्या मनोगतात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून साहित्य, शाहिरी आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून वंचित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला. तसेच लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रभक्ती, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि शिक्षणाविषयीच्या विचारांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.

अध्यक्षीय भाषणात श्री. महेश चव्हाण सर म्हणाले, “आज आपण दोन महान युगपुरुषांना अभिवादन करण्यासाठी एकत्र आलो आहोत. लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ हा प्रेरणादायी मंत्र देऊन संपूर्ण देशात स्वातंत्र्याची ज्योत चेतवली. ‘केसरी’ वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिश सत्तेला निर्भीडपणे आव्हान दिले आणि ‘गीतारहस्य’ या ग्रंथातून कर्मयोगाचा संदेश दिला. दुसरीकडे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक कार्यातून शोषित, वंचित व कष्टकरी समाजाचा आवाज बुलंद केला. विद्यार्थ्यांनी या दोन्ही महापुरुषांच्या जीवनातून जिद्द, चिकाटी, देशप्रेम, सामाजिक समता आणि मानवतेची प्रेरणा घ्यावी. त्यांच्या विचारांचा वारसा जपणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थ्यांनी केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्या कु. वंदना पोले मॅडम, प्रा. एस. एल. राठोड, प्रा. एन. टी. राठोड, श्री. एस. जी. राठोड, कराळे सर, व्ही. जे. राठोड, गणेश मुसळे, कु. आर. के. डेकाटे मॅडम, वरिष्ठ लिपिक महेंद्र अघम, कनिष्ठ लिपिक अमोल राठोड, युवराज जाधव, चंदन चव्हाण, विलास चिकणे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी वातावरणात पार पडला. महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपत राष्ट्रप्रेम, सामाजिक समता आणि कर्तव्यनिष्ठा या मूल्यांचा स्वीकार करण्याचा संदेश विद्यार्थ्यांना या कार्यक्रमातून देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

इंडोनेशिया ने पीएम मोदी को सर्वोच्च सम्मान ‘बिंटांग आदिपूर्णा’ से सम्मानित किया

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को उनके कार्यकाल में इंडोनेशिया का सर्वोच्च सम्मान ‘बिंटांग आदिपूर्णा’ मिला है देश का दौरा जारी हैइंडोनेशिया के राष्ट्रपति प्रबोवो सुबिआंतो ने

सुप्रीम कोर्ट: बैंकों की संस्था सावधानी सूची के जरिए वकीलों को ब्लैकलिस्ट नहीं कर सकती

सुप्रीम कोर्ट ने मंगलवार को माना कि भारतीय बैंक संघ (आईबीए) के पास सार्वजनिक रूप से यह घोषणा करने का कोई अधिकार नहीं है कि

सुप्रीम कोर्ट: बैंकों की संस्था सावधानी सूची के जरिए वकीलों को ब्लैकलिस्ट नहीं कर सकती

सुप्रीम कोर्ट ने मंगलवार को माना कि भारतीय बैंक संघ (आईबीए) के पास सार्वजनिक रूप से यह घोषणा करने का कोई अधिकार नहीं है कि

सऊदी की फ्लाईएडील हैदराबाद से रियाद के लिए सीधी उड़ान के साथ भारत में प्रवेश करती है

सऊदी अरबकम लागत वाली वाहक फ्लाईएडील ने दैनिक सीधी उड़ानें शुरू करने के साथ भारतीय बाजार में प्रवेश किया है हैदराबाद और रियादव्यापारिक यात्रियों, प्रवासियों