डॉ. सुरेश रसूले यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची नेत्र तपासणी; मोतीबिंदू रुग्णांसाठी अल्पदरात शस्त्रक्रियेची सुविधा
राजना : ग्रामीण भागातील नागरिकांच्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने श्री गजानन गणेश मंडळ, राजना यांच्या वतीने ‘स्वस्थ डोळे, सुखी जीवन’ या संकल्पनेतून मंगळवार, दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता श्री गजानन मंदिर, राजना येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात सेनगाव, तालुका हिंगोली येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. सुरेश रसूले यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. आधुनिक कॉम्प्युटर मशीनच्या सहाय्याने डोळ्यांची तपासणी करण्यात आल्याने नागरिकांना आपल्या डोळ्यांच्या आरोग्याबाबत आवश्यक माहिती मिळाली.
डोळ्यांना जवळचे किंवा दूरचे कमी दिसणे, सतत डोकेदुखी, डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे आदी समस्या असलेल्या नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. विशेष म्हणजे तपासणीदरम्यान मोतीबिंदू आढळून आलेल्या रुग्णांसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रिया अल्पदरात करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. तसेच ज्यांना चष्म्याची आवश्यकता आहे, अशा रुग्णांना अल्पदरात चष्मा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली.
ग्रामीण भागात अनेक नागरिक डोळ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. वेळेवर तपासणी व योग्य उपचार मिळाल्यास अनेक समस्या नियंत्रणात आणता येतात. याच उद्देशाने मंडळाने आयोजित केलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
या सामाजिक उपक्रमाच्या आयोजनासाठी श्री गजानन गणेश मंडळाचे अध्यक्ष श्री. कैलास दशरथ हजारे व उपाध्यक्ष श्री. अनिरुद्ध रामकिसन ठोंबरे यांच्यासह मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
ग्रामीण नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केल्याबद्दल श्री गजानन गणेश मंडळाच्या सामाजिक उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.

इंडोनेशिया ने पीएम मोदी को सर्वोच्च सम्मान ‘बिंटांग आदिपूर्णा’ से सम्मानित किया
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को उनके कार्यकाल में इंडोनेशिया का सर्वोच्च सम्मान ‘बिंटांग आदिपूर्णा’ मिला है देश का दौरा जारी हैइंडोनेशिया के राष्ट्रपति प्रबोवो सुबिआंतो ने



