Home » Uncategorized » मनोज राठोड आणि सागर राठोड यांची व्हिज्युअल इफेक्टस क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी..

मनोज राठोड आणि सागर राठोड यांची व्हिज्युअल इफेक्टस क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी..

Share:

हिवळणी (ता. पुसद) :-येथील रहिवासी तथा प्रतिष्ठित नागरिक लक्ष्मण बदू राठोड (कारभारी) यांचे सुपुत्र मनोज लक्ष्मण राठोड व सागर लक्ष्मण राठोड हे दोघे भाऊ गेल्या अनेक वर्षांपासून VFX (व्हिज्युअल इफेक्ट्स) क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. मोठे बंधू मनोज राठोड हे २०१३ पासून VFX आर्टिस्ट म्हणून कार्यरत असून, आपल्या सुमारे १३ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी १०० हून अधिक हॉलिवूड व बॉलीवूड चित्रपटांवर काम केले आहे. विशेष म्हणजे Marvel व DC या सुप्रसिद्ध चित्रपट मालिकांतील अनेक सुपरहिरो चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तसेच ‘Tenet’, ‘Dune Part 1’ आणि ‘Dune Part 2’ यांसारख्या ऑस्कर विजेत्या चित्रपटांच्या VFX कामात त्यांचा सहभाग असून, ही बाब त्यांच्या कारकिर्दीतील एक मोठी उपलब्धी मानली जाते.

मोठ्या भावाच्या मार्गदर्शनाखाली सागर राठोड यांनी २०१६ मध्ये आपले शिक्षण पूर्ण करून २०१७ साली पोस्टहाऊस VFX स्टुडिओमधून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी विविध नामांकित स्टुडिओमध्ये काम करत आपल्या कौशल्याची छाप पाडली. आजपर्यंतच्या सुमारे ८ वर्षांच्या कारकिर्दीत सागर यांनी ६० हून अधिक चित्रपटांमध्ये VFX आर्टिस्ट म्हणून योगदान दिले असून, सागरणे पण Marvel व Dc या सुप्रसिद्ध मालिकातील सुपर्रहिरो मूवी वर काम केले असून काही ऑस्कर विजेत्या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले आहे.

सागर राठोड यांचे इयत्ता 6 वी पर्येंत शिक्षण आडगाव येथील राष्ट्रीय विद्यालयात झाले असून, त्यानंतरचे माध्यमिक शिक्षण नवी मुंबई येथे पूर्ण झाले. उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी तळेगाव (पुणे) येथे पूर्ण केले. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लक्ष्मण राठोड यांनी हिवळणी गावातून नवी मुंबई येथे स्थलांतर करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळेच मुलांना योग्य शिक्षण व संधी उपलब्ध होऊन आज त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे.

हिवळणी गावातून सुरुवात करून मुंबईमार्गे सिडनी (ऑस्ट्रेलिया)पर्यंतचा सागर राठोड यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी व संघर्षमय ठरला आहे. त्यांच्या अथक परिश्रम, जिद्द आणि कुटुंबाच्या पाठबळामुळे त्यांनी हे यश संपादन केले आहे. सागर राठोड यांची सिडनी येथील नामांकित स्टुडिओमध्ये VFX आर्टिस्ट म्हणून निवड झाली असून, ही बाब केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण हिवळणी गाव आणि बंजारा समाजासाठीही अभिमानाची आहे.

सागर राठोड यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *