पुसद प्रतिनिधी
डोगराच्या पायथ्याशी वसलेले पुसद तालुक्यातील मांडवा गाव लोकनेते मनोहरराव नाईक यांच्या प्रयत्नातुन मांडवा गावासाठी पाण्याच्या समस्यांसाठी आतापर्यंत गावासाठी सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या चार विहिरी उपलब्ध करुन दिल्यात व सध्या सांडवा व बोरी (खु)या दोन गावाच्या शेत शिवारातील विहिरीतुन पाणी पुरवठा होत आहे.परंतु गावाला पाणी समस्यासाठी मे महिन्यात मोठा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत लोकसहभागातुन भौतिक विकास कामे झाली आहेत.त्याचेच एक पाऊस म्हणून उपसरपंच विजय राठोड यांनी स्वतःहून पुढे येऊन दोन लाख तीस हजार रुपयांतुन विहीरीचे खोदकाम तसेच सरपंच तथा प्रशासक अल्का ढोले व ग्रामपंचायतीने जागा मालक शेतकरी गोदाजी सुपले यांना एक लाख रुपये देण्याचे जाहीर केले.बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वदिनी लोकसहभागातील विहिरीच्या खोदकामाला सुरुवात करण्यात आली. अण आठ फुटावरच पाणी लागले. जसे जसे खोदकाम होत आहे तसे तसे झरे फुटत आहेत हे पाणी बघून गावकऱ्यांना आनंद वाटत आहे की पाण्याची समस्या मिटेल. हा गावकऱ्याचा आनंद बघून ग्रामविकास अधिकारी एस.टी.तडसे यांनी गावकऱ्यांना गोड भाताचा महाप्रसाद दिला.राज्यमंत्री इंद्रनीलभाऊ नाईक यांनी विहिर बांधकामासाठी व पाईपलाईन साठी निधी उपलब्ध करून द्यावा . अशी ग्रामस्थांच्या वतीने मागणी होत आहे.







