मेन्यू

लोड हो रहा है...

अनसिंगच्या तेजेश राठोडने कराटे स्पर्धेत पटकाविले सुवर्णपदक; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

अनसिंगच्या तेजेश राठोडने कराटे स्पर्धेत पटकाविले सुवर्णपदक; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

अमरावती विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत तेजेशची दमदार कामगिरी

अनसिंग : अनसिंग येथील होतकरू विद्यार्थी तेजेश गणेश राठोड याने शालेय विभागीय कराटे स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकाचा मान पटकाविला आहे. त्याच्या या यशामुळे अनसिंगसह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बिरुजी मस्के विद्यालय, वाई येथील इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या तेजेश गणेश राठोड याने १९ वर्षांखालील वयोगटातील ५८ किलो वजन गटात अमरावती विभागीय शालेय कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्याने राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे.

तेजेशने मिळविलेल्या या यशामागे त्याची मेहनत, जिद्द, चिकाटी आणि नियमित सराव यांचा मोठा वाटा आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय कराटे प्रशिक्षक मास्टर बालकीसन नवगणकर सर तसेच सेंसाई सौरभ बालकीसन नवगणकर सर, अनसिंग यांना दिले आहे.

तेजेशच्या या यशाबद्दल विद्यालयातील क्रीडा शिक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्थाचालकांनी त्याचे अभिनंदन करून पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर क्रीडा क्षेत्रात मोठी भरारी घेता येते, हे तेजेशने आपल्या यशातून सिद्ध केले आहे. आता राज्यस्तरीय स्पर्धेतही तो उज्ज्वल यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

इंडोनेशिया ने पीएम मोदी को सर्वोच्च सम्मान ‘बिंटांग आदिपूर्णा’ से सम्मानित किया

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को उनके कार्यकाल में इंडोनेशिया का सर्वोच्च सम्मान ‘बिंटांग आदिपूर्णा’ मिला है देश का दौरा जारी हैइंडोनेशिया के राष्ट्रपति प्रबोवो सुबिआंतो ने

सुप्रीम कोर्ट: बैंकों की संस्था सावधानी सूची के जरिए वकीलों को ब्लैकलिस्ट नहीं कर सकती

सुप्रीम कोर्ट ने मंगलवार को माना कि भारतीय बैंक संघ (आईबीए) के पास सार्वजनिक रूप से यह घोषणा करने का कोई अधिकार नहीं है कि

सुप्रीम कोर्ट: बैंकों की संस्था सावधानी सूची के जरिए वकीलों को ब्लैकलिस्ट नहीं कर सकती

सुप्रीम कोर्ट ने मंगलवार को माना कि भारतीय बैंक संघ (आईबीए) के पास सार्वजनिक रूप से यह घोषणा करने का कोई अधिकार नहीं है कि

सऊदी की फ्लाईएडील हैदराबाद से रियाद के लिए सीधी उड़ान के साथ भारत में प्रवेश करती है

सऊदी अरबकम लागत वाली वाहक फ्लाईएडील ने दैनिक सीधी उड़ानें शुरू करने के साथ भारतीय बाजार में प्रवेश किया है हैदराबाद और रियादव्यापारिक यात्रियों, प्रवासियों