विजय राठोड यांना भारतरत्न सरदार वल्लभ भाई पटेल हिंदू रत्न पुरस्काराने सन्मानि
स्थानिक:पुसद वसंतराव नाईक विद्यालय,पुसद येथील कलाशिक्षक विजय जीवा राठोड यांना भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार 31-10- 2026 ला नवी पेठ पुणे येथे माननीय रवींद्र साठे खादी व ग्राम उद्योग राज्यमंत्री स्वातंत्र कार्यभार मंत्रालय,मुंबई आणि हिंदूरत्न डॉ.रवींद्र दि.भोळे व जय श्रीराम शिक्षण संस्था भिमा कोरेगाव संस्थापक सुभाष कट्यार मल तथा अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.विजय जीवा राठोड यांनी सदर पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर केले असता,त्यांचे शिक्षण क्षेत्रातील अविरत व उत्कृष्ट कार्य,तथा कला क्षेत्रातील अतुलनीय सेवा त्याशिवाय विविध विषयावरील प्रदर्शनी च्या माध्यमातून जनजागृती, व्यसनमुक्ती,ध्वज प्रदर्शनी, वारली चित्र प्रदर्शनी,राष्ट्रीय कार्य अश्या महत्वपूर्ण कार्याची दखल घेऊन निवड करण्यात आली.या प्रसंगी विजय राठोड हे आपल्या पुरस्कारांचे श्रेय माननीय श्री.विजय भाऊ जाधव सचिव युवक मंडळ पुसद यांना दिले. व माननीय मुख्याध्यापक कु.वंदना पोले मॅडम वसंतराव नाईक विद्यालय पुसद तथा आदरणीय विद्यालयाचे सहकारी शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी व माझे गुरुजन वृंद तसेच पत्रकार बांधव यांनी विजय राठोड यांचे अभिनंदन केले आहे. या प्राप्त पुरस्कारामुळे समस्त स्तरातून कौतुकाचा वर्षाव व अभिनंदन केल्या जात आहे.

इंडोनेशिया ने पीएम मोदी को सर्वोच्च सम्मान ‘बिंटांग आदिपूर्णा’ से सम्मानित किया
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को उनके कार्यकाल में इंडोनेशिया का सर्वोच्च सम्मान ‘बिंटांग आदिपूर्णा’ मिला है देश का दौरा जारी हैइंडोनेशिया के राष्ट्रपति प्रबोवो सुबिआंतो ने



