Home » राजकारण » आमदार इंद्रनिल नाईक यांच्या मदतीने आरोग्य सहायता कक्षाचे उद्घाटन मोठ्या उत्साहाने संपन्न

आमदार इंद्रनिल नाईक यांच्या मदतीने आरोग्य सहायता कक्षाचे उद्घाटन मोठ्या उत्साहाने संपन्न

Share:

पुसद:- उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्य अभिनव उपक्रम 22 जुलै रोजी माजी मंत्री मनोहरराव नाईक यांच्या हस्ते पंतप्रधान जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सहायता कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

उद्घाटन करताना

          आमदार इंद्रनील नाईक यांनी आरोग्य सहाय्यता कक्षाचे उभारण्याची एकमेव कारण,की गोरगरिबांना या योजनेचा लाभ मिळावा आणि आजारी लोकांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये, म्हणून ही आरोग्य सहायता कक्ष भरण्यात येत आहे. आणि यापुढे सुद्धा आरोग्य विभागाविषयी चांगले काम करण्यात येईल असे आमदार इंद्रनील नाईक यांनी सांगितले.

          या कार्यक्रमा वेळी आरोग्य विभागाचे जिल्हाप्रमुख डॉ. दर्शन चांडक तसेच आरोग्य मित्र,माजी शिक्षण सभापती बि. जी.सर अर्बन बँक पुसदचे संचालक शरद मेंद, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुसिंग आडे, सरपंच श्री. जामवंत राठोड, तसेच राष्ट्रवादीचे विविध पदाधिकारी या कार्यक्रमात उपस्थित होते.

Leave a Comment