
पुसद :-व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटना पुसद यांची आज दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी विश्रामगृह पुसद येथे आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी व्हाँईस आँफ मीडिया पत्रकार संघटना पुसदचे तालुका अध्यक्ष समाधान केवटे हे होते.
या आढावा बैठकीमध्ये यवतमाळ येथे होणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शालेय साहित्याचे वाटप तसेच शिर्डी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाला जाण्यासाठी चर्चा करण्यात आली व यवतमाळ व शिर्डी येथे कार्यक्रमाला सर्व सन्माननीय पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित रहावे अशा सूचना देण्यात आल्या.

या सभेला व्हाँईस ऑफ मीडिया पत्रकार संघटना पुसदचे उपाध्यक्ष अविनाश आखरे. कोषाध्यक्ष प्रा. एस, एल. राठोड. संघटक रवी खरात. प्रसिद्ध प्रमुख अरुण बरङे.सदस्य अरविंद कांबळे विजय चव्हाण .रवीकांत शिंगणकर अश्विन केवटे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण बरङे.यांनी केले आभार प्रदर्शन प्रा.एस.एल. राठोड यांनी मानले.








