Home » देश » माहितीचा अधिकार कायदा केवळ नावापुरताच राहिला……

माहितीचा अधिकार कायदा केवळ नावापुरताच राहिला……

Share:

राहुल चव्हाण व ईश्वर राठोड यांचे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आमरण उपोषण

उपोषण करता राहुल चव्हाण व ईश्वर राठोड

महाराष्ट्र शासनाने खूप वाजा गाजा करीत माहिती अधिकार कायदा संमत केला. ह्या कायद्याने अधिकाऱ्याचे दहावेदनावले जाईल. परंतु माहिती अधिकाऱ्याच्या लाखो केसेस शासन दरबारी पडल्या आहेत. अधिकारी राजरोजपणे भ्रष्ट करीत आहेत. कायद्याचा कोणताच दबाव राहिलेला नाही. अंजली दामिनीया ह्या आप पक्षाच्या कार्यकर्ता असून त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध केलेल्या आरोपाबाबत माहिती अधिकाऱ्याला जाब विचारले तरी त्यांना न्याय मिळाला नाही. भ्रष्टाचारी चौकशी त्याच विभागाच्या अधिकारी करित असल्याने तो ते प्रकरण पद्धतशीरपणे दाबून टाकतो. भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला आहे.

             अशाच प्रकारे पुसद तालुक्यातील कृष्णा नगर गावात ग्रामपंचायतने सिंचन,विहीर,घरकुल, जलसिंचन, बांधकाम, डास फवारणी, शोचखड्डा,शौचालय, पाणी फिल्टर या कामात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप गावातील ग्रामस्थ राहुल केलास चव्हाण व ईश्वर काळू राठोड यांनी माहिती अधिकारात हे मागणी केलेले आहे.परंतु माहिती अधिकारी यांनी साधी चौकशी सुद्धा केली नाही. शासनाच्या कायद्याला केराची टोपली दाखविली आहे. सामान्य माणसाला ह्या कायद्याने न्याय मिळत नाही. वरचे अधिकारी प्रकरणे थांबवितात.महाराष्ट्र राज्यात या कायद्याला अधिकाऱ्यांनी नावापुरताच ठेवला आहे.अधिकारी व नेते यांनी हा कायदा सशक्त होऊ दिला नाही. ग्रामस्थांनी याबाबत उपोषण करण्याचे ठरवल्याने ते गावात उपोषणाला बसले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *