
पुसद –
आजची युग हे संगणकाची युग आहे. संगणकाच्या युगात माहिती तंत्रज्ञानाने जगात धुमाकूळ घातली आहे. आज तालुक्याच्या प्रमाणात लोकसंख्या असलेल्या गावात म्हणजे तालुक्यातील शेंबाळपिंपरी गावात ए.के कॉम्प्युटर मल्टीसर्विस चे दालन उघडले. ह्या दालनाच्या उद्घाटनासाठी भावी आमदार तसेच सामाजिक कार्य करणारे तरुण तडफदार युवा नेते ययातीभाऊ नाईक यांच्या हस्ते ए.के कॉम्प्युटर सर्विस चे उद्घाटन झाले.
या कॉम्पुटर सर्विस मुळे गावातील बहुतेक कामे त्यात ऑनलाइन, बुकिंग,ट्रान्सफर तसेच सर्वच ऑनलाईन कामे होणार असल्याचे मत ययातीभाऊंनी व्यक्त केले.आपल्या परिसरात सामान्य लोक ते विद्यार्थी वर्ग यांच्या अडचणी त्या मार्फत सोडवल्या जातील. त्यात अनेक शासकीय कामाच्या निविदा फॉर्म तसेच खरेदी विक्री संदर्भात केले जाईल. असे मत दुकानदार मालकाने व्यक्त केले. युवा नेते ययातीभाऊने सदर दालनाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गावात ह्या दालन्याने बऱ्याच अडचणी कमी होतील असे ययातीभाऊंनी आपल्या मनोगतात मत मांडले या वेळी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.








