
पुसद :-तालुक्यातील पारध या गावातील लोभिवंत महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पारध शाळेमध्ये 15 ऑगस्ट 2024 रोजी 78 व ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा करण्यात आला. ध्वजारोहणाची मान श्री जनार्दन महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.

त्याप्रसंगी गावातील तंटामुक्त अध्यक्ष नारायण राठोड, पोलीस पाटील ओंकार राठोड, माजी सरपंच गोपाल चव्हाण, ह.भ.प प्रल्हाद महाराज, त्र्यंबक राठोड, विजय चव्हाण, कृष्ण राठोड, भोपासिंग डीलर गावातील विविध पदाधिकारी ग्रामस्थ, शाळेचे आजी-माजी विद्यार्थी, सर्व मित्र मंडळ तसेच मुख्याध्यापक श्री बुरकुले सर, श्री पवन सर, श्री रवी पवार सर उपस्थित होते.