
पुसद(राजना):- भारत देशामध्ये अनेक उत्साह साजरा केला जातात. भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. उत्पादन वाढवण्यामध्ये शेतकरी आणि पशु यांची महत्त्वाची भूमिका असते. महाराष्ट्र मध्ये मोठ्य उत्साहाने बैल पोळा साजरा केला जातो. त्या दिवशी शेतकरी बैलांचा आभार मानत असतात. शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण म्हणजे पोळा सोमवार २ सप्टेंबर रोजी राजना या गावात पोळा साजरा झाला. पावसाचे सावट असताना, तरीही मोठ्या उत्साहाने बैल पोळा साजरा करण्यात आला. सर्व गाव नागरिक एकत्र येऊन एकमेकांना बैलपोळ्याचे शुभेच्छा देत होते. पोळा शांततेत पार पडला.









