तरुणांनो महाराजांची ऊर्जा घेऊन आपणच आपल्या क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज बना- प्रा.गजानन जाधव

पुसद -अंधार होत चाललाय आता दिवा पाहिजे पुन्हा एकदा महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे ही हाक आजच्या काळात अनेक माणसाच्या तोंडातून येताना आपल्याला दिसते परंतु आजच्या वास्तववादी जीवनात जगताना शिवाजी महाराज परत येणे नाही, येईल ती शिवाजी महाराजांची ऊर्जा, घ्यावे लागतील ते छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार यातूनच आपल्याला आपला नवजन्म घडवून आणायचा आहे आणि हातात पेन आणि कम्प्युटरचा माऊस घेऊन आपणच आपल्या क्षेत्रात नेत्र दीपक प्रगती करून टॉपर बनायचे आहे, अर्थात आपणच आपल्या क्षेत्रातले शिवाजी महाराज बना .असा मार्मिक संदेश प्रा. गजानन जाधव यांनी तरुणांना दिला . १९ फेब्रुवारी रोजी दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय वरुड पुसद येथे महाविद्यालयीन युवकांनी आयोजित केलेल्या शिवजयंती महोत्सवात प्रमुख वक्ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत वासनिक विचार पिठावर उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून रा से यो कार्यक्रमाधिकारी डॉ. शितल देवसरकर, डॉ. प्रसाद पाटील, डॉ. नारनवरे ,डॉ. धोत्रे कार्तिका महाजन, वाकडे, शिंदे उपस्थित होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून मानाचा मुजरा करण्यात आला .डॉक्टर वासनिक यांनी शाल श्रीफळ व बुके देऊन प्रमुख वकतांचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित विविध प्रकारचे नृत्य सादर केले .ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला राजमाता जिजाऊ माँ साहेबांच्या संस्कारातून महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सामान्यतील असामान्य व्यक्तिमत्व असून शून्यातून स्वराज्य निर्माण करणारे व स्त्रियांचा सन्मान करणारे एकमेव राजे आहेत. सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन कु. प्रज्ञा बेद्रे तर आभार ओम गोरे यांनी मानले . याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अत्यंत आनंदमय वातावरणात शिवजयंती उत्सव सोहळा संपन्न झाला.








