Home » Uncategorized » योगा फाउंडेशन द्वारा संचालित महाराष्ट्र योग शिक्षक संघ,पुसद तालुका. अध्यक्षपदी मा.श्री. विशाल शिवराम जाधव (सर)

योगा फाउंडेशन द्वारा संचालित महाराष्ट्र योग शिक्षक संघ,पुसद तालुका. अध्यक्षपदी मा.श्री. विशाल शिवराम जाधव (सर)

Share:

योगा फाउंडेशन द्वारा संचालित महाराष्ट्र योग शिक्षक संघ,पुसद तालुका. अध्यक्षपदी मा.श्री. विशाल शिवराम जाधव (सर) योग वर्ग जगदंबा देवी मंदिर परिसर, स्नेहनगर.इटावा वार्ड. पुसद यांची तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांची योग कार्यात असलेली तळमळ, निष्ठा त्याचप्रमाणे आपल्या कार्यात असलेली योग साधकाविषयी असलेली कार्य तत्परता हेरून महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष मा.श्री. शरद भाऊ बजाज तसेच संस्थापक अध्यक्ष मा. श्री.मनोज निलपवार ( सर ) तथा राज्य उपाध्यक्ष मा. श्री.मनोज नाईक (सर ) मा. श्री.प्रवीण मस्के (सर) राज्य लिगल सेलचे राज्य प्रभारी ऍड. मा.श्री.बाबुराव मस्के नाईक (सर ).प्रा. मा. श्री .गोविंद फुके (सर) जगदंबा देवी मंदिर परिसर स्नेहनगर यांच्या योगशिक्षिका सौ. विजयाताई चव्हाण. योगशिक्षिका सौ.कल्पना ताई मस्के. योगशिक्षिका रंजीता ताई कन्नावार. तसेच असंख्य योग साधकांच्या उपस्थितीत नियुक्ती करून पुढील कार्यासाठी व भरभराटीसाठी विशाल जाधव सर यांना शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी बोलताना पुसद योग्य शिक्षक संघाचे नवनियुक्त तालुका अध्यक्ष मा.विशाल जाधव (सर )यांनी आपण जी माझ्यावर पुसद तालुक्याच्या अध्यक्षपदाची सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी सोपवलेली आहे ती निश्चितच प्रामाणिकपणे पार पाडण्याची प्रयत्न करीन अशा प्रकारचे आश्वासन दिले. तसेच याप्रसंगी योगगुरु मा. श्री.विलास पल्लीकोंडावार (सर ) अमेरिकेत प्रस्थान प्रसंगी सर्व योग साधकांनी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. ह्याप्रसंगी प्रवीण मस्के सर यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे व योगसाधकांचे आभार मानून अल्पोपहार करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *