पुसद:-येथील माऊंट लिट्रा झी स्कूलचे विद्यार्थी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करून शाळेचे नावलौकिक केले. सदर राज्यस्तरीय स्पर्धा अनसिंग येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राज्यातून 322 स्पर्धकांनी सहभाग घेतले. सदर शाळेचे विद्यार्थीनी अलीना खतीब ,जिज्ञा पवार, श्लोक खोंड या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक मिळाले.जानवी मगर, देवांशी पवार , अरहम खतीब, पार्थ पवार, पलक नाज, अनम नाज, तेजश्री काष्टे, निधी पवार या विद्यार्थ्यांनी कराटेचे उत्कृष्ट सादरीकरण करून सिल्वर मेडल व ब्रांज मेडल प्राप्त केले. सदर शाळेत विद्यार्थ्यांना कराटेचे दररोज प्रशिक्षण दिल्या जाते. त्यामुळे सदर शाळेचे विद्यार्थी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये उत्कृष्ट असे सादरीकरण उज्वल यश प्राप्त केले. सदर विद्यार्थ्यास मार्गदर्शन बालकिशन नवघनकर व तिवारी मॅडम यांनी केले. सदर विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व सर्व संचालक मंडळ ,शाळेचे अकॅडमी डायरेक्टर, शाळा समन्वयक, प्रशासन अधिकारी ,सर्व क्रिडा प्रशिक्षक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले.








