पुसद:- तालुक्यातील राजना गावात ग्रामपंचायत कार्यालय येथे देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत राजना येथे ध्वजारोहण सरपंच सौ. चंदाबाई अवचित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रमुख उपस्थितीत माजी कृषी उत्पन्न बाजार समिती पुसदचे सभापती अवचितराव पवार, उपसरपंच शंकर आडणे, ग्रामपंचायत सदस्य मनोहर राठोड, विनोद पवार, सौ. जाधव, सौ. रंजना संतोष राठोड, महेश चव्हाण, गजानन हजारे, सचिन ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच तंटामुक्त समिती अध्यक्ष संतोष काळे, पोलीस पाटील श्रावण श्रीरामे, माजी पोलीस कैलास चव्हाण, माजी सरपंच हरिचंद जाधव, माजी सरपंच बाजीराव काळे, माधव काळे, शेतकरी मित्र बाळू ढोणे, गणेश कुमला राठोड, लघु उद्योजक राजू हजारे, भाटू चव्हाण तसेच समस्त ज्येष्ठ-श्रेष्ठ गावकरी मंडळींची उपस्थिती लाभली.
कार्यक्रम शांततेत व देशभक्तीच्या वातावरणात पार पडला. उपस्थित मान्यवरांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विषद करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.








