पुसद :-तालुक्यातील राजना येथील जिल्हा परिषद शाळेत ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सागर पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी गावाच्या सरपंच सौ. चंदाबाई अवचित पवार, उपसरपंच शंकर आडणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रंजीत मस्के यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अवचितराव पवार, ग्रामस्थ हरिचंद जाधव, बाजीराव काळे, माधवराव काळे, तंटामुक्त अध्यक्ष संतोष काळे, पोलीस पाटील श्रावण श्रीरामे, माजी पोलीस कैलास चव्हाण, शेतकरी मित्र बाळू ढोणे तसेच ग्रामपंचायत सदस्य मनोहर राठोड, विनोद पवार, सौ. जाधव, सौ. रंजना संतोष राठोड, महेश चव्हाण, गजानन हजारे, सचिन ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ओमकार पवार यांच्याकडून इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. तसेच माजी पोलीस कैलास चव्हाण यांनी शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमासाठी देणगी दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश कराळे, शिक्षक आशिष दूधे, चव्हाण मॅडम, नंदू पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रम देशभक्तीच्या वातावरणात पार पडला.








