Home » शिक्षण » वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय मतदान दिवस उत्साहात साजरा

वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय मतदान दिवस उत्साहात साजरा

Share:


कनेरवाडी वार्ता
युवक मंडळ द्वारा संचालित वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय मतदान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्य कु वंदना पोले ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक नरेश राठोड, भूमेश्वर डोक, विजय राठोड, हे प्रमुख वक्ते विचार पिठावर उपस्थित होते
लोकशाहीची अखंडता मतदानाचे महत्त्व व त्यात युवकांचा सक्रिय सहभाग याबाबत विद्यार्थ्यांचे जनजागृती करण्याचा उद्देशाने शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्राध्यापक नरेश राठोड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क व कर्तव्य असून युवकांनी निर्भयपणे निपक्ष व जबाबदारीने मतदान करावे असे आवाहन केले लोकशाही व्यवस्थेत मतदारांची भूमिका किती महत्त्वाची आहे हे विविध उदाहरणाद्वारे त्यांनी स्पष्ट केले अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य कु वंदना पोले यांनी मतदार हा लोकशाहीमध्ये राजा असतो म्हणून विद्यार्थ्यांनी मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक कु रश्मी डेकाटे यांनी केले तर आभार कार्यक्रम अधिकारी प्रा शेषराव राठोड यांनी मांडले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते
या कार्यक्रमाच्या यशाकरिता राजेश भुरभुरे, अभिजीत राठोड, विष्णू इंगळे, संजय राठोड, बाळासाहेब कराळे, अविनाश राठोड, विजय राठोड, महेश चव्हाण, पांडुरंग जाधव, अमोल राठोड, युवराज जाधव,कु दुर्गा धोत्रे, कु आरती बाबर, कु कोमल चव्हाण, कु पूनम काळे, कु दीक्षा जाधव, प्रशांत जवादे,यश कांबळे, आनंद गजभार, यांचे अथक परिश्रम लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *