राजना वार्ता
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जास्तीत जास्त घरकुले काम पूर्ण करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२६ असून १ मे२०२६ ला गृहप्रवेश करायचा आहे. हक्काच्या घरकुल पासून कोणीही वंचित राहू नये यासाठी यंत्रणेने १ मे पर्यंत दिलेले घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान केले आहे.
राहण्यासाठी हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते मात्र जागा आर्थिक परिस्थिती अभावी अनेकांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होत नाही १ मे पर्यंत घरकुल पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन ॲक्शन मोडवर आली आहे. प्रभारी अंमलबजावणी करण्यासाठी गावात प्रभात फेरी काढून जनजागृती केली.
पुसद तालुक्यातील राजना गावाला आज दि. १०/०२/२०२६ रोजी यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की साहेब यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पहिला हप्ता वितरित झालेल्या घरकुलाची पाहणी करून भूमिपूजन करण्यात आले.
तसेच घरकुल लाभार्थ्यांना ३० मार्च पर्यंत घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
राजना येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या संपूर्ण घराची पाहणी केली ज्या लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम केले त्यांना दुसरा व तिसरा हप्ता त्वरित वितरित करण्यात येईल असे सांगितले.
यावेळी पुसद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल आदेलवाङ, विस्तार अधिकारी शेख साहेब, ग्रामपंचायत अधिकारी एस. बी. चव्हाण, गृहनिर्माण अभियंता कुणाल आडे, गावाचे सरपंच चंदाबाई अवचितराव पवार , मा. कृषी उत्पन्न बाजार समिती पुसद सभापती अवचितराव पवार, गावाचे उपसरपंच गुणाजी आडणे, ग्रामपंचायत सदस्य विनोद पवार, प्रदीप जाधव, मनोहर राठोड, रंजना संतोष राठोड, ठोंबरे, गजू हजारे, महेश चव्हाण,शेतकरी मित्र बाळू ढोणे, आजी- माजी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांच्यासह आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या. तसेच राजना गावातील समस्त नागरिक उपस्थित होते.







