24 मार्च 2026 रोजी रोटरी क्लब नाशिक येथे होणार पुरस्काराने सन्मानित!
बातमी- पुसद
रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र वाहिनीचे विदर्भ उपसंपादक तथा दैनिक सुवर्ण महाराष्ट्र पुसद तालुका प्रतिनिधी,धम्मक्रांती प्रज्ञापर्व समिती पुसद 2025 चे कार्याध्यक्ष,अन्याय अत्याचार निर्मूलन समिती यवतमाळ जिल्हाध्यक्ष, नुकत्याच संपन्न झालेल्या धम्म परिषदेत महाबोधी संस्थेचा धम्मभूषण पुरस्कार प्राप्त असे पत्रकार तथा बहुआयामी व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ते विविध पुरस्काराने सन्मानित सन्माननीय आयु. राजेश ढोले यांना ज्ञानदीप सामाजिक विकास संस्था महाराष्ट्र नाशिक यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव पुरस्कारासाठी विदर्भातून निवड करण्यात आली असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल आठवले, व संस्थेचे सचिव मिलिंद कळवणकर यांनी पुरस्कार निवड पत्राद्वारे कळविले आहे.
सदर पुरस्कार दिनांक 24 मार्च 2026 रोजी रोटरी क्लब सभागृह, गंजमाळ नाशिक महाराष्ट्र राज्य या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे तरी सहकुटुंब सह मित्रपरिवार उपस्थित राहण्याचे संस्थेच्या वतीने कळविले आहे.छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव पुरस्कार मिळाल्याने कौटुंबिक व मित्र परिवार तथा सहकारी यांच्या वतीने सर्वत्र अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सामाजिक कार्य व पत्रकारिता करीत असताना विविध मान्यवर व्यक्ती व संस्थेच्या वतीने आज पर्यंत विविध पुरस्काराने सन्मानित केले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव पुरस्कार आपल्याला जाहीर झाल्याने आपण केलेल्या कार्याची पावती सामाजिक ऋणातून मिळत असल्याची भावना पुरस्कार निवड झालेले पत्रकार राजेश ढोले यांनी बोलताना सांगितले.







