पुसद :-नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा व सभापती व सदस्य यांचा सत्कार विद्यानगरच्या वतीने दिनांक 11/03/2026 बुधवारी आयोजित करण्यात आला.या प्रसंगी मा.नगराध्यक्षा ॲड.सौ.मोहिनीताई इंद्रनिल नाईक, पाणी पुरवठा सभापती मा.श्री.राजेशभाऊ साळुंके, बांधकाम सभापती मा.श्री.अभिजीत पानपट्टे, शिक्षण सभापती मा.श्री विठ्ठलराव खडसे सर ,जेष्ठ नगरसेवक मा.श्री.राजुभाऊ दुधे,नगरसेविका सौ.जयश्री दुधे,नगरसेवक मा.श्री.पंडीतकर, ॲड. श्री विवेक देशमुख, श्री.जळगावकर साहेब, श्री.ठेंगे साहेब, कॉन्ट्रॅक्टर श्री.सुजीत चव्हाण ,श्री चंद्रकांत चावडाजी व बांधकाम अभियंता ई.मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचलन व प्रास्ताविक प्रा. गणेश रावते सर यांनी केले.प्रास्ताविक भाषणातून त्यांनी नगरातील समस्या व प्रलंबित कामाची माहिती प्रतिपादन केली.या प्रसंगी मा.राजुभाऊ दुधे यांनी मंजूर कामाबाबत माहिती देऊन ती पूर्ण करण्याबाबत आश्वासन दिले.प्रा.एस.एल.राठोड यांनी सदर नगर दत्तक घेऊन भौतिक सुविधांची पूर्तता
करण्याची विनंती केली.नगराध्यक्षा मा.ॲड. सौ.मोहिनीताई यांनी वॉर्डातील सर्व समस्या दूर करून प्रलंबित कामे पूर्ण करण्याबाबत आश्वासन देऊन शहराचा विकास करण्याबाबत कटिबद्ध असल्याची भावना व्यक्त केली.विद्यानगर वासियांनीभरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.या प्रसंगी सर्वांच्या उपस्थितीत नियोजित मंजूर सभागृहाचे भूमिपूजन नगराध्यक्षा ॲड.सौ.मोहिनीताई नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले.कार्यक्रमास प्रा.कडस्कर सर,श्री पावडे सर,श्री.लकडे सर,श्री.जारंडे सर,श्री.काईट सर ,श्री.ईंगळे सर,श्री.अरुण ठाकरे सर,श्री.रावसाहेब चौधरी,श्री.हामिने सर,श्री.बेद्रे सर,श्री कुंभारे साहेब, श्री होले साहेब, श्री.पवार साहेब,श्री चौधरी पाटील, श्री क-हाळे सर,श्री संगेवार सर,श्री चुकेकर सर,श्री प्रवीण शेळके,श्री बंडेवार सर श्री धोपटे साहेब, श्री.नरवाडे साहेब, जाधव साहेब, प्रा.सुहास जोहरकर श्री चैतन्य ठाकरे,श्री रवी पावडे,श्री झरकर सर, सौ.कुंभारे ताई,सौ.अर्चना क-हाळे,सौ.संजिवनी कडस्कर सौ.सुचिता पावडे,सौ.सुनिता ठाकरे,श्रीमती सुनिताई खराबे,सौ.रंजना लकडे ईंदूमती जारंडे, पुष्पाताई रावते सौ.विमल जोहरकर, सौ.वर्षा बंडेवार,सौ.संगेवार ताई ,सौ.तिलोत्तमा चौधरी,सौ.हामिने ताई श्रीमती शोभाताई बंडेवार ,सौ शेळके ताई सौ.वनिता मेद्राम, सौ.वाघमारे ताई,प्रा.सौ.प्रिती जोहरकर, सौ.रत्नपारखी,सौ.चव्हाण, सौ.ठाकरे ताई सौ.ईंगळे ताई
व विद्यानगर, जय नगर व स्नेह नगर येथील बांधव व भगिनी(नागरिक)मोठ्या संख्येने उपस्थीत होते.उपस्थितांचे आभार श्री.उत्तमराव जोहरकर सरांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यानगर वासियांनी परिश्रम घेतले.







