Home » जीवनशैली » सामाजिक » घरात जनक -जननी नको, पण संपत्ती हवी…

घरात जनक -जननी नको, पण संपत्ती हवी…

Share:


गुंज: आपल्या भारतीय संस्कृती मध्ये आई-वडिलांना देवासमान मानले जाते. परंतु आजच्या आधुनिक आणि वेगवान जीवनशैलीतील एक वेदनादायक वास्तव्य समोर येत आहे. अनेकांना माता पित्याची सेवा नको असते, पण त्यांची संपत्ती मात्र हवी असते. ज्या माता-पित्यानी आपल्याला चालायला, बोलायला, जगायला शिकविले. त्यांची किंमत जिवंत असताना कोणालाही नसते. पण त्यांच्या संपत्तीवर मात्र डोळा असतो. ही गोष्ट केवळ दुःख देणारी नाही, तर खूप मनाला वेदना देणारी आहे.
जनक – जननी म्हणजे आपले जन्मदाता आई वडील आपल्या मुलांसाठी आयुष्यभर कष्ट करतात. आई नऊ महिने पोटात वाढवते, संगोपन करते. दोघेही मुलांच्या शिक्षणासाठी, स्वावलंबी बनविण्यासाठी धडपड करीत असतात. त्यांच्या भविष्याकरिता स्वतःच्या इच्छा बाजूला ठेऊन आपल्या लेकरांच्या छोट्या छोट्या आनंदात त्यांना स्वतःचा आनंद दिसत असतो.बाल संगोपन करत असताना. त्यांना खूप त्रास सहन केलेल असते. आजारी असेल तर रात्रभर जागणारे आणि प्रत्येक संकटात आधार देणारे हेच आई-वडील असतात.
परंतु जेव्हा तेच आई-वडील वृद्ध होतात, तेव्हा काही मुलांना व सुनांना त्यांची जबाबदारी घेणे ओझे वाटू लागते ज्या पालकांनी आयुष्यभर काबाडकष्ट करून उभं केलेल्या घरात त्यांना राहण्यास जागा नसते. त्यांची काळजी घेणे किंवा सेवा करणे कठीण वाटते. अशावेळी काहीजण दुर्लक्ष करतात. किंवा वृद्धाश्रमात पाठवतात. पण त्याचवेळी घर, जमीन, दागिने, आणि पैशाच्या वाटणीसाठी मात्र भांडणे करतात. ही गोष्ट लाजिरवाणी आहे. तर समाजासाठी ही चिंतेची बाब आहे.
वृद्धापकाळत माता पित्याला फार काही नको असते. त्यांना फक्त मुलांचा सहवास, नातवंडाचे प्रेम आणि आदर हवा असतो. त्यांच्या आयुष्याचा शेवटचा काळ आनंदात जावा, एवढीच त्यांची इच्छा असते. त्यांनी आपल्यासाठी जे काही केले आहे. त्यांची परतफेड आपण कधीच करू शकत नाही, पण किमान त्यांना सन्मानाने जगू देणे ही आपली जबाबदारी असते. परंतु काही मुलं करत नाही. ही गोष्ट आपणही लक्षात ठेवायला पाहिजे. पृथ्वीवर जन्माला आलेले सगळेच माणस वृद्ध होणार आहे. आपण आपल्या घरामध्ये जे जे कृत्य करत आहोत. ते आपले मुलं त्यांच्या डोळ्यांनी पाहत आहे. भविष्यामध्ये आपल्यावर ही तीच वेळ येणार आहे. याची जाणीव ठेवून आपण वागायला पाहिजे.
आपल्या संस्कृतीत माता पित्याना आदराचे स्थान आहे.त्यांच्या आशीर्वादातच खरे सुख आणि यश दडलेले असते. म्हणून प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की संपत्ती तात्पुरती असते. पण जनक -जननी चे प्रेम आणि आशीर्वाद हे आयुष्यातील सर्वात मोठे धन असते. शेवटी लक्षात ठेवावे धन मिळू शकते.पण जन्म देणारे आई वडील पुन्हा मिळत नाही.
प्रा. सुनिता पवार (राठोड)
9623779998

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *