पुसद प्रतिनिधी
पुसद ते शेंबाळपिंपरी रोडवरील मांडवा जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बैल ठार झाला.सदर वृत्त असे की मांडवा येथील शेतकरी पांडुरंग रामजी घुक्से हे दि. १८मार्च रोजी सायंकाळी आपल्या बैल जोडी सहित घराकडे येत असताना त्यांचे बैल रानडुकराला बुजाडून गावाच्या दिशेने धावत निघाले. घरी आले असता बघितले तर त्याच्यातील एक बैल घरी पोहोचला परंतु दुसरा बैल घरी पोहचलाच नाही. तर गावाशेजारी असलेल्या शांतीधाम जवळील शेंबाळपिंपरी कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बैल ठार झाल्याचे संध्याकाळी ८ वाजता कळाले. सदर बैल हा ३०ते ३५ हजाराचा होता. यात शेतकऱ्याची आर्थिकहानी झाली.
मांडवा गावाजवळील वारंवार अपघाताचे प्रमाण लक्षात घेता तसेच गावकऱ्यांची मागणी सुद्धा असून गावाजवळ वाहनांचा वेग कमी करण्यासाठी अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी लवकरात लवकर गतिरोधक बसून देण्यात यावा.







