Home » जीवनशैली » सामाजिक » ७ एप्रिल ला पुसद येथे डॉ. भिमराव यशवंतराव आंबेडकरांचे ऐतिहासिक आगमन..

७ एप्रिल ला पुसद येथे डॉ. भिमराव यशवंतराव आंबेडकरांचे ऐतिहासिक  आगमन..

Share:

पुसद प्रतिनिधी
धम्मक्रांती प्रज्ञापर्व समिती २०२६च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३५व्या जयंती निमित्याने ७ एप्रिल ते१३एप्रिल पर्यंत सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.

धम्मक्रांती प्रज्ञापर्वाचे उद्घाटन भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भिमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या हस्ते होणार आहे.त्यांच्या आगमनानिमित्य नियोजन मिटिंगचे आयोजन
पारमिता बुध्दविहार महावीर नगर येथे करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारत कांबळे हे होते. तर उपस्थिती धम्मक्रांती प्रज्ञापर्वाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुनिल खाडे अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नरेंद्र पाटील यांच्या सामाजिक कार्याची दखल घेता त्यांची भारतीय बौद्ध महासभेच्या संस्कार विभाग सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.
या मिटिंगमध्ये भोलानाथ कांबळे, तुकाराम चौरे, सुखदेव भगत, यांनी आपले विचार व्यक्त केले.

डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबाच्या आगमनानिमित्त भव्य दिव्य स्वागत करण्यासाठी स्थानिक विश्रामगृह येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले असुन समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात येईल.

या कार्यक्रमासाठी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय बौध्द महासभेचे तालुकाध्यक्ष भारत कांबळे तसेच धमक्रांती प्रज्ञापर्वाचे अध्यक्ष प्रा.डॉ. सुनील खाडे यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ल. पु. कांबळे यांनी तर आभार विजय बहादुरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *