Home » जीवनशैली » सामाजिक » महात्मा ज्योतिबा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कार प्राप्त सदानंद इंगोले यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

महात्मा ज्योतिबा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कार प्राप्त सदानंद इंगोले यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

Share:

वसंत धारा न्यूज पोर्टल

राजना

दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्यस्तरीय व्यसनमुक्ती कार्यासाठी विशेष असलेले सदानंद इंगोले( ब्राह्मणगाव तालुका पुसद जिल्हा यवतमाळ ) यांचा भव्य सत्कार करण्यात आला राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय  व्यसनमुक्ती पुरस्कार प्राप्त सदानंद इंगोले यांनी समाजातील व्यसनाधीनता दूर करण्यासाठी केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय व प्रेरणादायी आहे. ग्रामीण भागात जाऊन जनजागृती, मार्गदर्शक व प्रत्यक्ष समुपदेशांच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना व्यसनमुक्त जीवनाकडे वळवले आहे. त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे अनेक कुटुंबांना नवजीवन मिळाले असून समाजात सकारात्मक बदल घडताना दिसत आहे.

या कार्यक्रमात माननीय श्री संजय भाऊ राठोड( अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री )यांच्या हस्ते सदानंद इंगोले यांना पुष्पगुच्छ व संविधान ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला समाज कल्याण विभागाच्या आयुक्त प्राजक्ता इंगळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती तसेच प्रमुख वक्ते संतोष अडसूळ यांनी व्यसनमुक्तीच्या कार्याचे महत्त्व पटवून देत समाजाने या चळवळीत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सदानंद इंगोले यांच्या कार्याचे कौतुक करत,त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजातील व्यसनमुक्ती अभियान अधिक बळकट करण्याची गरज व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *