पुसद: राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित झालेले पराते ले आऊट गांधीनगर पुसद येथील श्री. अविनाश राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त दि. २२ मे २०२६ रोजी रोप्य महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष या अँड. मोहिनी ताई इंद्रनील नाईक तर प्रमुख अतिथी म्हणून सौ. संगीता ताई जाधव उपस्थित होत्या. या त्रिवेणी संगम सोहळ्याचे मानकरी श्री. अविनाश राठोड व सौ.सुनिता राठोड यांच्या विवाहला २५ वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद वाढदिवस तसेच सेवापुर्ती मिळून रौप्य महोत्सव अशा तीन आनंदाचा संगम साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषण करताना मोहिनी ताई यांनी राठोड सर आणि सौ.राठोड मॅडम हे दोन्ही ज्ञानदानाचे कार्य करीत असताना सुद्धा सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभागी असतात असे आदर्शवत कार्य करत असल्याचे नमूद केले. तसेच त्यांच्या पाल्यांनी मिळविलेले यश- कन्या डॉ. राजश्री राठोड (MBBS) आणि पुत्र श्री. चिन्मय राठोड (Com Enginier) हया दोन्ही मुलांमध्ये रुजलेले संस्कार यांचा उल्लेख करून त्यांनी कुटुंबाच्या कार्याची कौतुक ही केले.
तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वसंत राठोड यांनी केले. प्रास्ताविक मुलगी डॉ. राजश्री अविनाश राठोड मी आपल्या आई-वडिलांच्या मेहनतीमुळे, संस्कार मुळे आणि मार्गदर्शनामुळे तुमच्या समोर आज इथे उभी आहे. आई बाबा नी आम्हाला फक्त शिक्षणच नाही. तर माणुसकी प्रामाणिकपणा आणि संघर्ष करण्याची ताकद दिली. आम्ही पाहिलेल्या जन्मदात्याचे कष्ट, त्याग आणि प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना तिच्या डोळ्यात अश्रू तरळले.तर मुलगा श्री. चिन्मय अविनाश राठोड यांनी आपल्या पालकांच्या जीवन संघर्ष , सामाजिक कार्य करत असताना दिलेल्या योगदानाचे चित्रफितीद्वारे सादरीकरण केले. या सादरीकरणामुळे उपस्थितांच्या मनात राठोड कुटुंबाविषयी प्रेम, आदर आणि जिव्हाळ्याची भावना व्यक्त झाली.
या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नातेवाईक मित्रपरिवार व मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थित मंडळींनी राठोड सर यांचा आदर्श घ्यावा असे मत व्यक्त केले.श्री. बाबाराव चव्हाण (सेवानिवृत्त ग्राम विकास अधिकारी) यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना या दोन्ही दांपत्याच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे विशेष कौतुक केले. उपस्थित मान्यवरांचे आभार मानताना श्री.अविनाश राठोड सरांनी मी माझ्या पाल्यांना बाहेरगावी शिकत असताना मोजकेच पैसे देत होतो. तरीपण माझ्या मुलांनी थोडे थोडे ते पैसे बचत करून हा आजचा रोप्य महोत्सव कार्यक्रम करण्यासाठी जो खर्च येत आहे. तो त्यांनी केलेला आहे.
अशाप्रकारे हा त्रिवेणी संगम सोहळा अतिशय थाटामाटात आणि उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला.







