Home » सामाजिक » सामाजिक » विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांचा सानुग्रह निधीसाठी समिती शिष्टमंडळाचा मंत्रालय मुंबई येथे पाठपुरावा

विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांचा सानुग्रह निधीसाठी   समिती शिष्टमंडळाचा मंत्रालय मुंबई येथे पाठपुरावा

Share:

विदर्भवाशीम तथा विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांचा सानुग्रह निधी एकमुस्त मिळण्यात यावा, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात यावे, तसेच मृदू व जलसंधारण विभाग घ्या वतिने सन २००६ ते २०१३ मधिल प्रकल्पग्रस्तांना जलसंपदा विभाग प्रमाणे सानुग्रह निधी मिळण्यात यावा याकरिता विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती चे कार्याध्यक्ष माणिकराव गंगावणे सर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ दि.७ ला रवाना झाले ते दि.८ व ९ जुन मंत्रालय मुंबई येथे उपस्थित राहुन यामध्ये मा.ना.गिरीष महाजन जलसंपदा मंत्री,वाढिव निधी संदर्भात मा.ना.मकरंद जाधव पाटील मदत व पुनर्वसन मंत्री, प्रमाणपत्र संदर्भात मा.ना.संजयभाऊ राठोड मृद व जलसंधारण मंत्री यांना निवेदन देऊन प्रलंबित कामासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली लवकरच मृद व जलसंधारण विभाग ची बैठक लागुन प्रश्न मार्गी लागतील असे शिष्टमंडळ यांना मा.ना.संजयभाऊ राठोड यांनी आश्र्वासित केले
यावेळी समिती शिष्टमंडळ मध्ये विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती चे विभागीय कार्याध्यक्ष माणिकराव गंगावणे, समितीचे विभागीय सदस्य शिवदास पाटील ताठे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र जाधव,सरपंच विजयराव आवटे, मनोहरराव मते,बाळुराव मारुटकर, भिकाजी सदार से.स.संस्था सदस्य, शिवशंकर भिंगारे, राजेंद्र भगत मा.सरपंच, रोहीदास चव्हाण,चेतन आडे,सत्यदिश गंगावणे इ.उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *