मेन्यू

लोड हो रहा है...

शब्द हा व्यक्तिमत्त्वाचा आरसा

वसंत- धारा न्यूज नेटवर्क
“बोले तैसा चाले,त्याची वंदावी पाऊले” ही संतवाणी माणसाच्या शब्दांचे महत्त्व अधोरेखित करते. माणसाची खरी ओळख त्यांच्या वेशभूषेने, संपत्तीने किंवा पदाने होत नाही, ती त्याच्या विचारानी,आचरणाने आणि विशेषतः त्यांच्या शब्दांनी होते. शब्द हे मनातील विचाराचे, भावनांचे आणि संस्काराचे प्रतिबिंब असतात.म्हणूनच म्हणतात. शब्द आणि विश्वास याचे नाते, अतूट आहे. माणूस कसा विचार करतो, इतरांशी कसा वागतो आणि समाजाकडे कोणत्या दृष्टीने पाहतो, याची स्पष्ट झलक त्यांच्या बोलण्यातून दिसून येते. आपण कसे बोलतो, कोणत्या भाषेत आणि कोणत्या भावनेने बोलतो, यावरून आपल्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख समाजाला होते.
शब्दांमध्ये माणसाला जोडण्याची आणि तोडण्याची दोन्ही शक्ती असते. गोड नम्र आणि आधार युक्त शब्द एखाद्याच्या मनात आपुलकी निर्माण करते,तर कठोर अपमानास्पद किंवा असत्य शब्द नातेसंबंध बिघडवू शकतात.शब्दांमध्ये माणसाला प्रेरणा देण्याची, दुःखी मनाला आधार देण्याची आणि तुटलेली नाती जोडण्याची विलक्षण ताकद असते. एखाद्याचे कौतुक करणारे दोन शब्द त्याच्या आत्मविश्वास वाढवून शकतात. तर अपमान करणारे शब्द आयुष्यभराची जखम करून जातात.म्हणून बोलण्यापूर्वी विचार करणे आवश्यक आहे. “बोले तैसा चाले”या उक्तीप्रमाणे शब्द आणि कृती यात संगती असेल तरच व्यक्तिमत्त्व प्रभावी ठरते.
आपल्या संतांनी आणि महापुरुषांनीही शब्दाचे महत्व अधोरेखित केले आहे.संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत कबीर, महात्मा गांधी आणि स्वामी विवेकानंद यांनी आपल्या प्रेरणादायी विचारातून अभंग किंवा ओव्या यामधून समाजाला योग्य विचार दिले. त्यांचे शब्द असे लोकांना सत्य, प्रेम, दया आणि मानवतेचा मार्ग दाखवतात.यावरून शब्दांची शक्ती किती मोठी आहे. हे लक्षात येते. आजच्या डिजिटल युगात शब्दांचे महत्त्व आणखी वाढले आहे. सोशल मीडियावर संदेश, ई-मेल टिपण्या आणि पोस्ट यामधूनही व्यक्तीचा स्वभाव आणि विचारसरणी स्पष्ट होते. त्यामुळे प्रत्यक्ष बोलताना किंवा लिहिताना सभ्य, संयमी आणि जबाबदार भाषेचा वापर करणे आवश्यक आहे. शब्द हे शस्त्रापेक्षाही अधिक प्रभावी असतात. शस्त्र शरीराला जखम करते, पण कटू शब्द मनाला जखम करतात. त्याचप्रमाणे प्रेमळ शब्द निराश मनाला नवचैतन्य देतात आणि जीवनात सकारात्मक बदल घडून आणतात.
माणसाच्या जीवनात शब्दांना अनन्य साधारण महत्व आहे. शब्द हे केवळ संवादाचे साधन नसून ते आपल्या संस्काराचे व्यक्तिमत्त्वाचे आणि चारित्र्याचे प्रतिबिंब आहेत. एखाद्या व्यक्तीची ओळख तिच्या बोलण्यावरून आणि त्यांना दिलेला शब्द किती प्रामाणिकपणे पाळते यावरून ठरते म्हणूनच आपल्या संस्कृतीत “शब्द हा धनापेक्षा मोठा असतो”असे म्हटले जाते. इतिहासात राजा हरिश्चंद्र आणि प्रभू रामचंद्र यासारख्या महान व्यक्तींनी शब्द आणि वचन यासाठी मोठा त्याग केला. त्यांच्या जीवनातून आपल्याला सत्य, प्रामाणिकपणा आणि शब्दांची शान जपण्याची प्रेरणा मिळते. परंतु आजच्या कलियुगात स्वार्थ, स्पर्धा आणि भौतिक सुखाच्या मोहामुळे माणूस अनेकदा स्वतःच्या शब्दापासून दूर जाताना दिसतो. दिलेली आश्वासने सहज दिली जातात. पण ती पूर्ण करण्याची तयारी मात्र कमी होत चालली आहेत. यामुळे माणुसकी यांचा पाया कमकुवत होत आहे. पण हा पाया पुन्हा भक्कम करण्याची जबाबदारी आपलीच आहे. चला आपण सर्वजण सत्य बोलण्याचा, दिलेला शब्द पाळण्याचा आणि शब्दाची शान जपण्याचा संकल्प करूया कारण “शब्द हे व्यक्तिमत्त्वाचा आरसा आहेत; तो आरसा नेहमी स्वच्छ, निर्मळ आणि विश्वासार्ह ठेवणे हीच आपल्या जीवनाची खरी ओळख आहे”.
प्रा. सुनिता पवार (राठोड)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

इंडोनेशिया ने पीएम मोदी को सर्वोच्च सम्मान ‘बिंटांग आदिपूर्णा’ से सम्मानित किया

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को उनके कार्यकाल में इंडोनेशिया का सर्वोच्च सम्मान ‘बिंटांग आदिपूर्णा’ मिला है देश का दौरा जारी हैइंडोनेशिया के राष्ट्रपति प्रबोवो सुबिआंतो ने

सुप्रीम कोर्ट: बैंकों की संस्था सावधानी सूची के जरिए वकीलों को ब्लैकलिस्ट नहीं कर सकती

सुप्रीम कोर्ट ने मंगलवार को माना कि भारतीय बैंक संघ (आईबीए) के पास सार्वजनिक रूप से यह घोषणा करने का कोई अधिकार नहीं है कि

सुप्रीम कोर्ट: बैंकों की संस्था सावधानी सूची के जरिए वकीलों को ब्लैकलिस्ट नहीं कर सकती

सुप्रीम कोर्ट ने मंगलवार को माना कि भारतीय बैंक संघ (आईबीए) के पास सार्वजनिक रूप से यह घोषणा करने का कोई अधिकार नहीं है कि

सऊदी की फ्लाईएडील हैदराबाद से रियाद के लिए सीधी उड़ान के साथ भारत में प्रवेश करती है

सऊदी अरबकम लागत वाली वाहक फ्लाईएडील ने दैनिक सीधी उड़ानें शुरू करने के साथ भारतीय बाजार में प्रवेश किया है हैदराबाद और रियादव्यापारिक यात्रियों, प्रवासियों