वसंत ✒️धारा न्यूज
पार्डी निंबी
पार्डी येथील श्री.मनोहरराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच श्री.लोभीवंत महाराज अपंग निवासी विद्यालय, पार्डी येथील वर्ग 1 ते 12 वि च्या विद्यार्थ्यांनी शासनाच्या पर्यावरण सुरक्षा धोरण अनुसरून “एक पेड माँ के नाम” या अभियानांतर्गत वृक्ष दिंडी गावातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली.
या वृक्षदिंडीमध्ये विद्यार्थी शिक्षक व गावातील प्रतिष्ठित नागरिक सहभागी झाली होते दिंडीचे रूपांतर वारी मध्ये झाले गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे विद्यार्थ्यांनी भजन,कीर्तन, सामूहिक नृत्य सादर करून पंढरपुर वारी सोहळा उत्सव साजरा केला.
यावेळी “वारी” म्हणजे केवळ पंढरपुर कडे निघालेली पायपीट नाही तर वारी हा श्रद्धेचा,समानतेचा, सहनशीलतेचा व सेवाभावाचा चालता बोलता उत्सव आहे यातून नैतिकतेचा वारसा पिढी दर पिढी संक्रमित होऊन आपण आज पर्यंत हजारो वर्षांचे प्रवासातून समृद्ध महाराष्ट्र घडविताना पाहतो आहे विद्यार्थी हे देशाचे भविष्य असल्यामुळे अशा सांस्कृतिक उत्सवानिमित्त सहभागी झाल्यामुळे त्यांच्या जिवन शैलीत निश्चितपणे सकारात्मक परिणाम दिसतील असे मत संस्थेचे अध्यक्ष गजानन मोगरे यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी काढलेल्या वारी मध्ये “बोला…पुंडलिक वरदे हरी विठ्ठल!श्री.ज्ञानदेव तुकाराम!!रामकृष्ण हरी!!!” नामाचा गजर करण्यात आला.
प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष कैलास चंद्रवंशी कोषाध्यक्ष नामदेव इसलकर सचिव प्रमोद चंद्रवंशी मुख्याध्यापिका मंदा भगत प्रभारी मुख्याध्यापक हर्दिप ठवरे,शेख लतीफ शेख मौला,सचिन सवाई, शेख रशीद शेख मन्सूर, मंगेश तिडके,अरुण चव्हाण, संध्या दहिकर, प्रा.डबोले,प्रा.कुऱ्हाडे,विशाल गोडसे, विनोद चंद्रवंशी, गजानन मरकड, सीताराम राठोड,एकनाथ वंजारे ग्रामस्थ उपस्थित होते.
सूत्र संचालन सहाय्यक शिक्षक दारासिंग चव्हाण तर आभार सहायक शिक्षक बाजीराव आढाव यांनी मानले.




