वसंत ✒️धारा न्यूज
पुसद प्रतिनिधी :- युवक मंडळ पुसद द्वारा संचालित वसंतराव नाईक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, पुसद येथे आज सुरक्षा व वाहतूक नियमांवर जबरदस्त जनजागृती कार्यशाळा पार पडली.
नेहमी पुस्तकात अडकलेल्या विद्यार्थ्यांना थेट पोलिसांनीच जीवनातले सर्वात महत्वाचे धडे दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या कु. वंदना पोले मॅडम होत्या. तर वसंतनगर पोलीस स्टेशनचे कडक शिस्तीचे अधिकारी पोलीस सहाय्यकनिरीक्षक सुगध पुंडगे पोलीस कॉन्स्टेबल अरविंद चव्हाण, सौ. प्रतिभा काळापाट आणि श्रीमती शकुंतला बाई देशमुख विद्यालय पुसद चे मुख्याध्यापक श्री.बालाजी भवानकर सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सायबर फसवणूक, अपघात टाळा – पोलिसांचे कडक आवाहन
कार्यक्रमाची सुरुवात स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर पुंडके साहेबांनी विद्यार्थ्यांना खड्या आवाजात समजावले –
“मोबाईलचा वापर जपून करा, सायबर गुन्ह्यांपासून सावध रहा. हेल्मेट घाला, वाहतूक नियम पाळा. एक चूक तुमचे आयुष्य संपवू शकते. कायदा मोडू नका, जबाबदार नागरिक बना.”
बालाजी भवानकर सर म्हणाले, “सुरक्षा ही फक्त पोलिसांची जबाबदारी नाही, ती आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. स्वतः सुरक्षित रहा आणि दुसऱ्यालाही सुरक्षित ठेवा.”
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रा. एस. एल. राठोड यांनी केले तर आभार विष्णूइंगळे सरांनी मानले.
यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. एन. टी. राठोड, प्रा. एस. एल. राठोड, भुवनेश्वर डोक, विजय राठोड, बाळू कराळे, व्ही. एस. इंगळे, महेश चव्हाण, गणेश मुसळे, अघम बाबू, अमोल राठोड , युवराज जाधव यांनी अथक परिश्रम घेतले.




