
वसंत ✒️धारा न्यूज नेटवर्क
पुसद, दि. १९ ऑगस्ट २०२६ : श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय, पुसद येथे तालुकास्तरीय नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षणाचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला.
या प्रशिक्षण कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी श्री. धीरज आडे, विस्तार अधिकारी श्री. उमेश वाघमारे, महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या आद. वैशाली पांडे मॅडम, केंद्र समन्वयक श्री. नूतनकुमार येवले तसेच बीआरसी टीम, सर्व सुलभक व शिक्षक उपस्थित होते.
नवीन अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी, अध्यापनातील आधुनिक पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्याच्या दृष्टीने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमातील विविध घटक, अध्यापन तंत्रे आणि शैक्षणिक उपक्रमांची माहिती देण्यात येणार आहे.
उद्घाटन कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी शिक्षकांनी बदलत्या शैक्षणिक गरजांनुसार स्वतःला अद्ययावत करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावीपणे कार्य करण्याचे आवाहन केले. शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला सकारात्मक वातावरण लाभले.




