मेन्यू

लोड हो रहा है...

दिवसा मातीत राबतो, रात्री शेतात जागतो… शेतकरी जगतोय की फक्त झगडतोय?*

लेखक  वसंत ✒️धारा न्यूज नेटवर्क
दिवसा उन्हात राबणारा आणि रात्री आपल्या पिकासाठी जगणारा शेतकरी आज नेमका जगतोय तरी कधी?
पहाटेचा अंधार संपण्याआधीच शेतकरी घराबाहेर पडतो. हातात अवजारे, मनात पिकाची चिंता आणि डोळ्यात उद्याच्या चांगल्या दिवसाची आशा घेऊन तो शेतीची वाट धरतो. पाणी देतो, तन काढतो, औषध फवारतो आणि आपल्या पिकाला लेकरासारखे जपतो. संध्याकाळ होते… पण शेतकऱ्यांचा दिवस मात्र संपत नाही! कारण त्याची रात्र सुरू होते ती पिकांच्या रखवालीने. रानडुकरांचे कळप, रोही समूह, वानरांची टोळी आणि इतर वन्य प्राण्यांचा वाढता उपद्रव्य शेतकऱ्यांसाठी मोठे संकट बनत चालला आहे. महिनोन महिने केलेली मेहनत एका रात्रीत उध्वस्त होण्याची भीती त्याला सतत सतवत असते. म्हणून रात्रीच्या काळोखात, हातात टॉर्च घेऊन, कधी बांधावर तर कधी शेताच्या मध्यभागी उभा राहून तो आपल्या पिकांचा पहारा देतो.
*शहरातील माणूस रात्री घराचे दार बंद करून निर्धास्त झोपतो; पण शेतकरी आपल्या पिकांचे दार उघडे ठेवून रात्रभर जागा असतो*
त्याला माहित असते-आज झोपलो, तर उद्या शेतात उभे पिक कदाचित दिसणारही नाही. कधी रानडुक्कर पिकांची नासधूस करतात,रोहि उगवलेला पीक नष्ट करतात. कधी वानरांची टोळी उभ्या पिकांवर तुटून पडतात. शेतकऱ्याने डोळ्यांत स्वप्रे घेऊन वाढवलेले पीक काही तासांत जमीन दोस्त होते. त्यावेळी केवळ पिकांचे नुकसान होत नाही; शेतकऱ्यांच्या अनेक महिन्यांच्या आशेचे, कष्टाचे आणि पैशाचे नुकसान होते. एक बी पेरताना त्याच्या मनात असते हजारो स्वप्रे. पिकवताना त्याच्या डोळ्यात असते मुलांच्या शिक्षणाची अशा. आणि पीक वन्य प्राण्यांनी उद्ध्वस्त केले की फक्त शेत उजाड होत नाही-त्याच्या मनातील अशाही उजाड होते.
*निसर्ग शी संघर्ष… आणि आता वण्याप्रायांशीही*
शेतकऱ्याला आधीच निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतो. कधी पाऊस कमी, कधी अतिवृष्टी, कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट, कधी रोगराई. त्यात वाढता शेतीचा खर्च, महागडी खते-बियाणे, औषधे, मजुरी आणि बाजारभावाची अनिश्चितता यामुळे शेतकरी अक्षरशः कात्रीत सापडला आहे. त्यात आता वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही त्याच्याच खांद्यावर आली आहे.*प्रश्न असा आहे-शेतकरी शेती करतोय की आपल्या पिकांचे रात्रंदिवस संरक्षण करण्याची नोकरीही करतोय*
शेतकऱ्याला वन्य प्राण्यांशी संघर्ष करायचा नाही त्याला निसर्गही प्रिय आहे. वन्य जीवांचे संरक्षण व्हावे, ही त्याचीही भावना आहे. पण त्याचवेळी त्याच्या कष्टाने उभी राहिलेली पीकही वाचले पाहिजे. म्हणून या समस्येकडे शेतकरी विरुद्ध वन्यजीव असा संघर्ष म्हणून पाहण्याऐवजी शेतकरी आणि वन्यजीव या दोघांच्या संरक्षणाचा समतोल मार्ग शोधणे आवश्यक आहे. आम्हा शेतकऱ्यांच्या व्यथा व्यक्त करण्यासाठी हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतरावजी नाईक नाही. म्हणून आम्ही सरकारला विनंती करतो की प्राण्यांवर *उपाय योजना केव्हा होणार*
पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी संवेदनशील भागात प्रभावी आणि सुरक्षित सौर कुंपण, सामुदायिक कुंपण, योग्य प्रकाश व्यवस्था, वन्य प्राण्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि तातडीची नुकसान भरपाई यासारख्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी गरजेची आहे. वन विभाग आणि कृषी विभागाने गाव पातळीवर गाव पातळीवर शेतकऱ्यांची संवाद साधून वन्य प्राण्यांच्या उपद्रव्याच्या कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी ठोस कृती आराखडा तयार करणे आवश्यक आहे.नुकसान झाल्यानंतर पंचनामा आणि मदत मिळण्याची प्रतीक्षा करण्यापेक्षा नुकसान होऊच नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक महत्त्वाच्या आहेत. कारण शेतकऱ्याला नुकसान भरपाईचा कागद नको; त्याला त्याचे उभे पिक वाचवायचे आहे.
*सहानुभूती नको… आधार हवा*
शेतकऱ्यांच्या वेदना केवळ एखाद्या दिवसाची बातमी बनवू नये. एखाद्या पिकाचे नुकसान झाले की दोन दिवस चर्चा होते आणि नंतर सगळे विसरले जाते. पण शेतकऱ्याच्या घरात मात्र त्या नुकसानाची वेदना अनेक महिने राहते. त्याच्या मुलाच्या शिक्षणावर परिणाम होतो. आरोग्याचा प्रश्न, घर खर्चाचे गणित बिघडते कर्जाची चिंता वाढते आणि पुढच्या हंगामासाठी पुन्हा कर्ज काढून तो नव्याने उभा राहतो. थकतो… पडतो… पण पुन्हा उठतो. कारण तो शेतकरी आहे. त्याच्या हाताला माती लागलेली असते; पण त्या मातीत देशाचे भविष्य दडलेले असते. सर्व बांधवांच्या पोटाच्या खळगीचा प्रश्न आणि शेवटी एक प्रश्न…..
रात्र गडद होते
गाव शांत झोपते
घराघरात दिवे विझतात
पण एका शेताच्या बांधावर एक माणूस अजूनही जागा असतो.
हातात टॉर्च
डोळ्यात चिंता
चेहऱ्यावर दिवसभराच्या कष्टाचा थकवा आणि नजरा आपल्या पिकावर खेळलेल्या
तो स्वतःशीच कदाचित म्हणत असेल…..
*दिवसा मातीत राबतो… रात्री पिकांसाठी जागलो… माझ्या लेकरांच्या भविष्यासाठी झगडतो… पण माझ्या भविष्यासाठी कोण जगणार*?
या एका प्रश्नाचे उत्तर आता केवळ सरकारने नव्हे, तर संपूर्ण समाजाने घ्यायची वेळ आली आहे. कारण शेतकरी केवळ धान्य पिकवीत नाही… तो आपल्या देशाचे भविष्य पिकवितो. त्याच्या हातातील माती म्हणजे देशाची भाकरी आहे. त्याच्या घामाचा प्रत्येक थेंब म्हणजे आपल्या ताटातील अन्न आहे. शेतकरी त्रस्त झाला आहे. शेतामध्ये कामाला मजूर मिळत नाही आहे. म्हणून आज गरज आहे ती त्याच्या दुःखावर केवळ अश्रू ढाळणे नाही… गरज आहे त्याच्या पिकाभोवती संरक्षणाची, त्याच्या कुटुंबाला योग्य मोबदल्याची, त्याच्या कुटुंबाला सुरक्षित भविष्याची आणि त्याच्या थकलेल्या मनाला आधाराची. कारण अन्नदाता जर रात्रभर जागत असेल, तर त्याच्या झोपेसाठी जगणारा समाज आपण कधी होणार? शेतकरी जगला, तर शेती जगेल शेती जगली, तर अन्नसुरक्षा जगेल आणि अन्नसुरक्षा जगली, तरच देश खऱ्या अर्थाने समृद्ध होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

इंडोनेशिया ने पीएम मोदी को सर्वोच्च सम्मान ‘बिंटांग आदिपूर्णा’ से सम्मानित किया

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को उनके कार्यकाल में इंडोनेशिया का सर्वोच्च सम्मान ‘बिंटांग आदिपूर्णा’ मिला है देश का दौरा जारी हैइंडोनेशिया के राष्ट्रपति प्रबोवो सुबिआंतो ने

सुप्रीम कोर्ट: बैंकों की संस्था सावधानी सूची के जरिए वकीलों को ब्लैकलिस्ट नहीं कर सकती

सुप्रीम कोर्ट ने मंगलवार को माना कि भारतीय बैंक संघ (आईबीए) के पास सार्वजनिक रूप से यह घोषणा करने का कोई अधिकार नहीं है कि

सुप्रीम कोर्ट: बैंकों की संस्था सावधानी सूची के जरिए वकीलों को ब्लैकलिस्ट नहीं कर सकती

सुप्रीम कोर्ट ने मंगलवार को माना कि भारतीय बैंक संघ (आईबीए) के पास सार्वजनिक रूप से यह घोषणा करने का कोई अधिकार नहीं है कि

सऊदी की फ्लाईएडील हैदराबाद से रियाद के लिए सीधी उड़ान के साथ भारत में प्रवेश करती है

सऊदी अरबकम लागत वाली वाहक फ्लाईएडील ने दैनिक सीधी उड़ानें शुरू करने के साथ भारतीय बाजार में प्रवेश किया है हैदराबाद और रियादव्यापारिक यात्रियों, प्रवासियों