पुसद : पुसद शहरातील आंबेडकर चौक परिसरात भरदिवसा दोन लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना समोर आली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. राजना येथील मुकदम शामराव जयराम राठोड यांच्याकडील दोन लाख रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शामराव राठोड हे कामानिमित्त पुसद शहरात आले होते. आंबेडकर चौक परिसरात असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या जवळील रोख रक्कम चोरल्याचे समोर आले. काही वेळाने पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरात शोध घेतला; मात्र चोरट्याचा ठावठिकाणा लागला नाही.
या घटनेनंतर परिसरातील CCTV कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली असून, संशयित व्यक्ती CCTV फुटेजमध्ये दिसून आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासाला महत्त्वपूर्ण धागा मिळण्याची शक्यता आहे.
भरदिवसा गजबजलेल्या आंबेडकर चौक परिसरात दोन लाख रुपयांची चोरी झाल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. संबंधित पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेऊन चोरीची रक्कम परत मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.

इंडोनेशिया ने पीएम मोदी को सर्वोच्च सम्मान ‘बिंटांग आदिपूर्णा’ से सम्मानित किया
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को उनके कार्यकाल में इंडोनेशिया का सर्वोच्च सम्मान ‘बिंटांग आदिपूर्णा’ मिला है देश का दौरा जारी हैइंडोनेशिया के राष्ट्रपति प्रबोवो सुबिआंतो ने



