मेन्यू

लोड हो रहा है...

ब्राह्मणगाव व १३ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पुस प्रकल्पावरून मंजुरीसाठी मा. इंद्रनील नाईक राज्यमंत्री यांच्या पुढाकाराने मंत्रालयात बैठक

पुसद : यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील ब्राह्मणगावसह १३ गावांना पुस प्रकल्पातील जलसाठ्याचा उपयोग करून शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. राज्यमंत्री श्री. इंद्रनील नाईक यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या तांत्रिक व्यवहार्यतेचा अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.

पुसद तालुक्यातील सिंगरवाडी, उडती, औसापूर, पांडुरणा, ब्राह्मणगाव, शांपूर, वडगाव आदी गावांचा एकत्रित विचार करून एक किंवा दोन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या दृष्टीने तांत्रिक अभ्यास करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. सध्या काही गावांमध्ये जिल्हा परिषदेमार्फत पाणीपुरवठा योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र उन्हाळ्यात विद्यमान जलस्रोत अपुरे पडण्याची शक्यता लक्षात घेता दीर्घकालीन आणि शाश्वत जलस्रोत उपलब्ध करून देण्यासाठी पर्यायी व्यवस्थेचा अभ्यास करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

पुस प्रकल्पातील उपलब्ध जलसाठ्याचा ब्राह्मणगावसह संबंधित १३ गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेद्वारे उपयोग करता येईल का, याची प्रत्यक्ष पाहणी करून तांत्रिक व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. यासाठी गावांचे अंतर, भौगोलिक परिस्थिती, उंच-सखल प्रदेश, आवश्यक पाइपलाइन, उपलब्ध पाणीसाठा तसेच भविष्यातील लोकसंख्येची पाण्याची गरज यांचा एकत्रित विचार करून अहवाल तयार करण्यास सांगण्यात आले.

गोंडमांजरीच्या पाणीपुरवठ्याचाही आढावा

बैठकीत गोंडमांजरी येथील पाणीपुरवठ्याचा देखील आढावा घेण्यात आला. गावासाठी उपलब्ध जलस्रोत, धरणापासूनचे अंतर आणि आवश्यक पाइपलाइन यांचा विचार करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांचा अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले. पाणीटंचाईच्या काळात उपलब्ध पाण्याचा साठा करता यावा, यासाठी आवश्यकतेनुसार बॅलन्स टँक उभारण्याबाबतही सूचना करण्यात आली.

पुसद तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणीप्रश्नावर मंत्रालयीन पातळीवर झालेल्या या बैठकीमुळे ब्राह्मणगावसह १३ गावांना पुस प्रकल्पातून शाश्वत पाणीपुरवठा मिळण्याच्या दृष्टीने तांत्रिक प्रक्रिया पुढे जाण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

बैठकीस श्री. गव्हाणकर, मुख्य अभियंता, श्री. प्रफुल व्यवहारे, कार्यकारी अभियंता, श्री. काळबांडे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, यवतमाळ, श्री. नितीन तट्टे, वरिष्ठ भूवैज्ञानिक, यवतमाळ, श्री. स्वप्नील राठोड, उपअभियंता, पुसद, श्री. गेडाम, उपअभियंता, पुसद तसेच श्री. आकाश राऊत, कनिष्ठ अभियंता आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

इंडोनेशिया ने पीएम मोदी को सर्वोच्च सम्मान ‘बिंटांग आदिपूर्णा’ से सम्मानित किया

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को उनके कार्यकाल में इंडोनेशिया का सर्वोच्च सम्मान ‘बिंटांग आदिपूर्णा’ मिला है देश का दौरा जारी हैइंडोनेशिया के राष्ट्रपति प्रबोवो सुबिआंतो ने

सुप्रीम कोर्ट: बैंकों की संस्था सावधानी सूची के जरिए वकीलों को ब्लैकलिस्ट नहीं कर सकती

सुप्रीम कोर्ट ने मंगलवार को माना कि भारतीय बैंक संघ (आईबीए) के पास सार्वजनिक रूप से यह घोषणा करने का कोई अधिकार नहीं है कि

सुप्रीम कोर्ट: बैंकों की संस्था सावधानी सूची के जरिए वकीलों को ब्लैकलिस्ट नहीं कर सकती

सुप्रीम कोर्ट ने मंगलवार को माना कि भारतीय बैंक संघ (आईबीए) के पास सार्वजनिक रूप से यह घोषणा करने का कोई अधिकार नहीं है कि

सऊदी की फ्लाईएडील हैदराबाद से रियाद के लिए सीधी उड़ान के साथ भारत में प्रवेश करती है

सऊदी अरबकम लागत वाली वाहक फ्लाईएडील ने दैनिक सीधी उड़ानें शुरू करने के साथ भारतीय बाजार में प्रवेश किया है हैदराबाद और रियादव्यापारिक यात्रियों, प्रवासियों