मुंबई : वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी परिसरात प्रस्तावित नवीन विमानतळाच्या अनुषंगाने मंत्रालय, मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. विधानपरिषदेचे आमदार महंत बाबूसिंग महाराज तसेच राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे या विमानतळाच्या प्रस्तावाला गती मिळावी, यासाठी संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
पोहरादेवी हे बंजारा समाजाचे प्रमुख धार्मिक व सांस्कृतिक केंद्र आहे. देशाच्या विविध भागांतून भाविक व पर्यटक येथे येत असतात. त्यामुळे या परिसरात विमानतळाची सुविधा निर्माण झाल्यास धार्मिक पर्यटन, रोजगार, व्यापार, दळणवळण आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळू शकते.
बैठकीत प्रस्तावित विमानतळाच्या अनुषंगाने आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया, प्रकल्पाची सद्यस्थिती, विविध विभागांकडून आवश्यक असलेल्या बाबी तसेच पुढील कार्यवाही याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विमानतळाला लवकरात लवकर आवश्यक प्रशासकीय मंजुरी मिळावी, यासाठी पुढील कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला.
या प्रकल्पासाठी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचे योगदान व पाठपुरावा महत्त्वाचा ठरत असून, पोहरादेवीच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी या विषयाला प्राधान्य दिल्याचे सांगण्यात येत आहे. महंत बाबूसिंग महाराज आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या प्रयत्नांमुळे प्रस्तावित विमानतळाच्या विषयाला प्रशासकीय पातळीवर गती मिळण्याची अपेक्षा आहे.
पोहरादेवी विमानतळ साकारल्यास बंजारा समाजाच्या श्रद्धास्थानाला देशाच्या विविध भागांशी थेट हवाई जोडणी मिळण्यास मदत होईल, तसेच वाशिम जिल्ह्यासह परिसरातील आर्थिक व पर्यटन विकासाला नवी दिशा मिळू शकते. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पुढील निर्णयाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

इंडोनेशिया ने पीएम मोदी को सर्वोच्च सम्मान ‘बिंटांग आदिपूर्णा’ से सम्मानित किया
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को उनके कार्यकाल में इंडोनेशिया का सर्वोच्च सम्मान ‘बिंटांग आदिपूर्णा’ मिला है देश का दौरा जारी हैइंडोनेशिया के राष्ट्रपति प्रबोवो सुबिआंतो ने



