पुसद : कृषी उत्पन्न बाजार समिती, पुसदच्या मुख्य प्रवेशद्वाराला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतरावजी नाईक साहेब यांचे नाव देण्याची मागणी अखेर मार्गी लागली आहे. बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला असून लवकरच नामकरण सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.याबाबत यवतमाळ जिल्हाध्यक्ष गोरसेना श्री. जय अजय राठोड यांनी निवेदन देऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराला कै. वसंतराव नाईक यांचे नाव देण्याची मागणी केली होती. या निवेदनाची दखल घेत राज्याचे राज्यमंत्री मा. ना. इंद्रनील मनोहरराव नाईक यांच्या सूचनेनुसार हा विषय बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला.दरम्यान, बाजार समितीच्या संचालक मंडळाने यापूर्वीच यासंदर्भात ठराव घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यानंतर दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेतील ठराव क्र. ०७ (३) नुसार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराला कै. वसंतरावजी नाईक साहेबांचे नाव देण्याचा ठराव अधिकृतपणे मंजूर करण्यात आला.कै. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राच्या विकासासाठी तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराला त्यांचे नाव देण्याचा निर्णय हा शेतकरी व कृषी क्षेत्रासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे.लवकरच नामकरण सोहळाठराव मंजूर झाल्यानंतर आता लवकरात लवकर नामकरण सोहळा आयोजित करून बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘कृषिसंत हरितयोद्धा कै. वसंतराव नाईक प्रवेशद्वार’ असे नाव देण्यात येणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती, पुसद प्रशासनाने पत्राद्वारे कळविले आहे.या निर्णयामुळे गोरसेनेच्या मागणीला यश आले असून, पुसद तालुक्यातील शेतकरी व कै. वसंतराव नाईक यांच्या विचारांना मानणाऱ्या नागरिकांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे.

इंडोनेशिया ने पीएम मोदी को सर्वोच्च सम्मान ‘बिंटांग आदिपूर्णा’ से सम्मानित किया
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को उनके कार्यकाल में इंडोनेशिया का सर्वोच्च सम्मान ‘बिंटांग आदिपूर्णा’ मिला है देश का दौरा जारी हैइंडोनेशिया के राष्ट्रपति प्रबोवो सुबिआंतो ने